आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

... आणि तिला जडले हे विचित्र व्यसन, सौंदर्यवती होण्यासाठी चक्क खातेय मेकअपचे साहित्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुंदर बनवण्याच्या इच्छेने एका तरूणीला मेकअपचे साहित्य खाण्याचे व्यसन जडले आहे. या तरूणीचे नाव ब्रिटनी (22 वय) असून ती ओहियोच्या टोलडिआची रहिवासी आहे. टीव्ही चॅनलच्या एका कार्यक्रमामध्ये तिने या गोष्टीचा खुलासा केला, की आयशॅडो आणि कॉम्पॅक्ट पावडर खाणे तिला खूप आवडते. ती एका दिवसात 15 ते 20 कॉम्पॅक्ट खाते. सौंदर्यवती होण्यासाठी ती सौंदर्यप्रसाधने खात असल्याचे तिने सांगितले.
ब्रिटनीच्या या व्यसनाचे तिच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. मेकअपच्या साहित्यात वापरले जाणारे केमिकल्स तिच्या हृदयाला धोका निर्माण करत आहे. ब्रिटनीने सांगितले, की तिला सुंदर दिसायचे होते म्हणून तिने तिच्या आईची सौंदर्यप्रसाधने वयाच्या 9व्या वर्षीपासून खायला सुरूवात केली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या ब्रिटनी कशाप्रकारे खरेदी करते मेकअपचे साहित्य...?