आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Unseen China, 100 वर्षांपूर्वी असा दिसायचा हा शेजारी आता दिसतो असा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(100 वर्षांपूर्वीच्या चीनचे छायाचित्रे)

लोकसंख्या, गॅजेट, रोबोट्स अशा गोष्टींची नावे कानावर आले की, लगेच चीनचे नाव आपल्या डोळ्यासमोर येते. या देशाने स्वतःला एवढ्या वेगाने विकसित केले आहे की कोणी विचारही करू शकत नाही. सध्याचे चीन आणि 100 वर्षांपूर्वीचे चीन या दोघांचा जर विचार केला तर कोणालाच विश्वास बसणार नाही. केवळ एवढ्या एका शतकात जो विकास केला आहे तसा विकास करण्यास अनेक देशांना अनेक शतके लागली आहेत. आज चीनमध्ये अशक्य अशी एकही गोष्ट नाही. तंत्रज्ञान, विज्ञान, उद्योग, कला, संस्कृती अशा सर्वच बाबतीत चीन आघाडीवर आहे.
चीनची वाढती लोकसंख्या, त्यानंतर एकामागोमाग एक असे आधुनिक गॅजेट, उंचच उंच इमारती अशा अनेक गोष्टींकडे पाहिले असता चीनचे कौतूक केल्या वाचून मनाला शांत बसवत नाही. आज आण्ही तुम्हाला चीनची 100 वर्षांपूर्वीची छायाचित्रे दाखवणार आहोत. यामध्ये 100 वर्षांपूर्वी चीन कसे दिसत होते आणि आज ते कसे दिसते याची तुम्हाला कल्पना येईल.
100 पूर्वी चीन आज जसे दिसत आहे तसे बिलकूल दिसत नव्हते. चीन सुध्दा इतर आशिया अथवा आफ्रीकेच्या देशांप्रमाणे खुपच मागास देश होता. येथेही झोपड्या खेडी, शेत, जंगल, धूळ, माती अशाच गोष्टीची भरमार होती. एवढेच नव्हे तर त्या वेळी चीन एकदम अमागास देशांमध्ये मोजला जात होता.
सर्वात जूनी संस्कृती असलेला हा देश साम्राज्यवादी देशांनी आपापल्यात वाटून घेतला होता. तेथे कुख्यात ओपन डोर पॉलिसू लागू करण्यात आली होती. ज्याअंतर्गत इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, रूस, अमेरिका आणि जापान या देशांना आपापला हिस्सा काढून घेतला होता आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणावरून साधन संपत्तीची लुट करण्यात येत होती. चीनमध्येही भारताप्रमाणे स्वातंत्र्यासाठी खुप मोठा संघर्ष झाला.
चीनमध्ये माओंच्या नेतृत्वाखाली सशस्त्र संघर्ष सूरू होता. आणि भारताच्या स्वातंत्र्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच 1949 मध्ये चीन स्वातंत्र्य झाला. यानंतर चीनने असा काही विकासाचा वेग घेतला ज्याचा कोणताच देश विचारही करू शकत नाही आणि आज हा देश संपूर्ण जगावर राज्य करत आहे. असा इतिहास असलेल्या या देशाची काही फार जुनी छायाचित्रे Divyamarathi.com घेऊन आला आहे खास तुमच्यासाठी....
चला तर मग जाऊयात 100 वर्षांपूर्वीचे चीन पाहायला... पुढील स्लाईडवर चीनचे 100 वर्षांपूर्वीचे आणि सध्याचे अशा दोन्ही प्रकारच्या छायाचित्रांचा समावेश आहे.

(नोट- 1 ते 20 व्या स्लाईडपर्यंतची छायाचित्रे ही 100 वर्षांपूर्वीच्या चीनची आहेत आणि 21 ते 31 क्रमांकाच्या स्लाईडवरील छायाचित्रे ही सध्याच्या चीनची आहे.)