आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: रहस्यमयी आहे हे आयलँड, जो राहण्यास गेला त्याचा झाला मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गिओला आयलँड, इटली)
जगभरात एकापेक्षा एक सुंदर आयलँड आहेत. तिथे दरवर्षी हजारो लोक फिरण्यासाठी येतात. परंतु काही ठिकाणे असेही आहेत, ज्यांना विषारी मानले जाते. असे एक आयलँड इटली च्या नेपल्समध्ये आहे. या आयलँडचे नाव गिओला आयलँड आहे. या आयलँडवर बनलेल्या व्हिलामध्ये जो व्यक्ती राहण्यास गेला, तो कधीच परत आला नाही.
खडकांच्या दोन तुकड्यांप्रमाणे दिसणा-या या आयलँडच्या एका भागात व्हिला बनला असून दुसरा भाग पूर्ण रिकामा आहे. नेपल्समध्ये असलेल्या यांना कर्स्ड (रहस्यमयी) आयलँडसुध्दा म्हटले जाते. लोकांच्या सांगण्यानुसार, या व्हिलामध्ये राहणा-या लोकांना मृत्यू होतो. यापूर्वी याच्या एका मालकाने आत्महत्या केली तर दुस-याला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर हा व्हिला असाच रिकामा राहिला, येथे जाण्यास लोकांच्या मनाच भय निर्माण झाला आहे.
5 मिनीटांत पोहून जाऊ शकता-
रहस्यमयी असूनदेखील अनेक लोक या आयलँडवर जातात. मात्र व्हिलामध्ये कुणालाच थांबण्याची इच्छा नसते. हे आयलँड नेपल्सच्या समुद्राच्या किना-यापासून खूप जवळ आहे. अशात स्विमिंग करणारे लोक जवळपास 5 मिनीटांत येथे पोहोचू शकतात. असे सांगितले जाते, की 19व्या दशकानंतर या आयलँडवर व्हिला बनवण्यात आला होता, त्यापूर्वी येथे फॅक्ट्री होती. मुख्य लँडला जोडण्यासाठी 1920मध्ये आयलँडवर केबल कारची सुविधा देण्यात आली होती. परंतु लवकरच ते बंद करण्यात आले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या आयलँडचे काही फोटो...