आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • OMG: Lion Saves A Baby Calf From Another Lion Attack

हरणाच्या पिल्लाला वाचवण्यासाठी धावून आला सिंह, दोन सिहांमध्ये जुंपली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील सर्वात क्रूर प्राण्यांमध्ये सिंहाचे नाव सामील आहे. त्याच्या तावडीत जर कुणी सापडले तर त्याला स्वत:ता जीव वाचवणे अशक्य आहे. परंतु वाइल्ड लाइफ जगात अनेकदा अनोखे नजारे पाहायला मिळतात, ज्यावर विश्वास ठेवणेसुध्दा कठिण होऊन बसते. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आफ्रिकेचे हरणाच्या पिल्लाचा वाचवण्यासाठी एका सिंहाने पुढाकार घेतला तर दुस-याने त्याची शिकार करण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ कुठला आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये.
व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येतेय, की हरणाचे पिल्लू शेतात फिरत असताना एक सिंह त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. परंतु स्वत:चा जीव वाचवण्यासाठी हरणाचे पिल्लू पळू लागते. तेवढ्यात दुसरा सिंह त्याचा जवळ घेऊन प्रेमाने गोंजरतो. या नजा-यावर विश्वास ठेवणे थोडे कठिण जाते. त सिंह जणूकाही स्वत:च्या बछड्याला गोंजारत आहे. तसेच हरणाचे पिल्लूसुध्दा त्याच्यासोबत खेळताना दिसते.
प्रेमाने गोंजरल्यानंतर दुसरा सिंह पुन्हा एकदा हरणाच्या पिल्लावर हल्ला करतो. परंतु पहिला सिंह पुन्हा हरणाच्या पिल्लाचा जीव वाचवतो. हा व्हिडिओ आतापर्यंत 94 लाख लोकांनी पाहिला आहे. सोशल साइट्सवर दुस-या प्लॅटफॉर्मवरसुध्दा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या घटनेचे काही फोटो...