आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेथ चेअरवर 9 कैद्यांनी गमावला होता जीव, या तुरुंगात होते कुख्यात गुन्हेगार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या चेअरवर 9 कैद्यांना मृत्यूची शिक्षा देण्यात आली. नंतर हा तुरुंग बंद करण्यात आला. परंतु आता याला पर्यटकांसाठी खोलण्यात आले आहे.
वॉशिंग्टन- अमेरिकेच्या एका तुरुंगात ज्या खुर्चीवर 9 कैद्यांना मृत्यूची शिक्षा देण्यात आली, ती पाहण्यासाठी आता शेकडो पर्यटक गर्दी करतात. डेली मेलने याला आपल्या रिपोर्टमध्ये 'मोस्ट डिस्टर्बिंग टूरिस्ट अट्रॅक्शन' म्हटले आहे. वेस्ट वर्जिनियाच्या या तुरुंगात अनेक कुख्यात गुन्हेगारांना कैद करण्यात आले होते. नंतर हे तुरुंग बंद झाले. आज आम्ही तुम्हाला या तुरुंगाचे आतले फोटो दाखवणार आहोत. अलीकडेच हा तुरुंग पर्यटकांसाठी उघडण्यात आला आहे.
हे तुरुंग 1866मध्ये उघडण्यात आले होते आणि 1995मध्ये बंद करण्यात आले. जी इलेक्ट्रिक चेअर पर्यटकांमध्ये लोकप्रिय होत आहे, त्याला ओल्ड स्पार्किसुध्दा म्हटले जाते. पर्यटकांना तुरुंगाच्या आयसोलेशन रुम, सेल ब्लॉक, मॅक्सिमम सिक्युरिटी सेलमध्येसुध्दा जाऊ दिले जाते.
ट्रॅव्हल गाइड याला अमेरिकेचे मोस्ट हॉन्टेड प्रिजनसुध्दा म्हणतात. या तुरुंगाविषयी अनेक भयावह किस्सेसुध्दा ऐकायला मिळतात. तुरुंगात नोकरी करणारा अनेक स्टाफसुध्दा मानतो, की येथे अनेकदा 'भूत' दिसतात. पर्यटकांसाठी उघडण्यात आल्यानंतर या तुरुंगाचे आतील फोटो समोर आले आहेत. काही लोकांनी या फोटोंवर कमेन्ट करून लिहिले, की कमकुवत मनाच्या लोकांनी या तुरुंगाला भेट देऊ नये. तसेच काही लोक म्हणतात, की संध्याकाळनंतर लोक या तुरुंगात येण्यास घाबरतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कुख्यात कैद्यांना ठेवण्यात आलेल्या या तुरुंगाचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...