आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One Of The Most Exciting Rail Routes In Whole North America

MOST EXCITING रेल्वे ट्रॅक, कधी नदी तर कधी खडकांवरून धावते ही ट्रेन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(नॉर्थ अमेरिकेमध्ये धावणारी कॅलिफोर्निया जेफर ट्रेन)
कॅलिफोर्निया जेफर नावाची ही रेल्वे अमेरिकेमध्ये ज्या ट्रॅकवरून धावते, त्याला जगातील सर्वात एक्सायटींग रेल्वे रुटपैकी एक मानले जाते. या ट्रॅकवर रेल्वे नदी, खडक, पर्वत, वाळवंट आणि बर्फ असा मार्गावरून धावते. रेल्वे जशी-जशी पुढे धावते तसे-तसे बाहेरील सीन बदलत जाते. परंतु या प्रवासाला सर्वात एक्सायटींग म्हणण्याचे आणखी कारण आहे. प्रवाशांना या परिसरात नैसर्गिक आणि संस्कृतिक सौंदर्यची ओळख करून देण्यासाठी रेल्वेमध्ये एक एज्युकेशनल कार्यक्रम चालवला जातो. ट्रेल्स आणि रेल्स नावाच्या ऑन बोर्ड प्रोग्राममध्ये प्रवासी येथील संस्कृतीला जवळून पाहू शकता.
नॉर्थ अमेरिकेतील सात राज्यातून धावणारी ही रेल्वे जवळपास 4 हजार किलोमीटरचे अंतर गाठते. शिकागोहून सुरु झालेल्या या रेल्वेचा प्रवास कॅलिफोर्नियाच्या अमरव्हिलेला संपतो. या रेल्वेमध्ये वर्षभरात कधीही प्रवास केला जाऊ शकतो. ही रेल्वे पहिल्यांदा 24 एप्रिल 1983 रोजी धावली होती. ही रेल्वे 88 किमी प्रती तासी वेगाने धावते. एकावेळी रेल्वेमध्ये 1 हजार 31 प्रवासी प्रवास करू शकतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कोण-कोणत्या मार्गाने धावते रेल्वे...