आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काय... ब्रेकअप झालंय? असे पडा दुखा:तून बाहेर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्यावर मनापासून प्रेम केले असेल त्याच्यासोबत झालेल्या ब्रेकअपमुळे खुप दुख: होते. भलेही हे दुख: मनाचे असेल, पण परिणामही अत्यंत खोलवर असतो. वैज्ञानिकांच्या मते, मनावरील घावामुळेही मेंदूचा दोच भाग अॅक्टिवेट होतो, जो शरीरावर झालेल्या घावाने अॅक्टिवेट होतो. म्हणजे मानावर झालेला घाव हा शरीरावर झालेल्या घावाइतकाच खोल असतो. तसे तर प्रेमातून मिळालेले दुख: विसरणे सोपे नाही, वैज्ञानिकांनी यावर संशोधन करून सिद्ध केले आहे की, हे दुख:ही अगदी सहज विसरता येऊ शकते.
 
करावे लागेल हे...
- संशोधनानुसार समोर आले आहे की, ज्या कामामुळे आशा निर्माण होते, असे काम केल्यास मनाला झालेले दुख: विसरणे शक्य आहे.
- हे काम मोठे किंवा खासच असावे असे काही नाही. काम लहान किंवा मोठे कसेही असू शकते.
- कदाचित त्यामुळेच जुन्या काळापासून सल्ला देण्यात येतो की, असे झाल्यास एखाद्या सकारात्मक कामात मन लावा. 
- संशोधकांनी हा निष्कर्ष एका आभ्यासाच्या आधारावर काढला आहे. हा आभ्यास भावनीक दुखा:वर प्लेसिबो इफेक्ट पाहण्यासाठी करण्यात आला होता.
- या आभ्यासासत सहभागी झालेल्या लोकांना एक नैसर्गीक स्प्रे देण्यात आला होता. या लोकांचे नुकतेच ब्रेकअप झाले होते. या स्प्रेमुळे तुम्हाला तुमच्या दुखा:तून बाहेर पडण्यास मदत होईल, असे त्यांना सांगण्यात आले होते. परंतु, त्या स्प्रेमध्ये कोणतेही औषध नव्हते. म्हणजे तो एक प्लेसिबो होता.
- जर्नल ऑफ न्यूरोसायन्समध्ये प्रसिद्ध झालेल्या या आभ्यासाची प्रमुख लेखिका डॉ. लियोनी कोबन यांचे मते, जर एखाद्या गोष्टीमुळे आपल्याला फायदा होईल, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला नक्की फायदा होतो. भलेही तो त्या गोष्टीमुळे झालेला नसेल.
- याच कारणामुळे आभ्यासात सहभागी झालेल्या लोकांनी मनावर चांगला परिणाम झाला असल्याचे सांगितले.

पुढील स्लाइडवर वाचा मन तुटल्याने मेंदूवर काय परिणाम होतो...
बातम्या आणखी आहेत...