आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाहेरून अागपेटीसारखे दिसते हे घर, आत पाहिल्यावर विश्वासच बसणार नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाहेरुन अतिशय साधे तर आतमध्‍ये असे मॉर्डन आहे हे घर. - Divya Marathi
बाहेरुन अतिशय साधे तर आतमध्‍ये असे मॉर्डन आहे हे घर.
तुम्‍ही एकापेक्षा एक अलिशान घरे पाहिली असतील. जे बाहेरुन भव्‍य आणि आतून अलिशान दिसतात. मात्र आज तुम्‍हाला अशा घराबद्दल सांगणार आहोत जे बाहेरुन अतिशय साधे म्‍हणजे केवळ माचिसच्‍या डब्‍बीसारखे दिसते. मात्र ते आतून अतिशय अलिशान आहे. 
 
असे आहे घर 
हे छोटेसे घर जापामधील टोकीयोशहरामध्‍ये सुनिगामी परिसरात आहे. जगातील अत्‍यंत महागड्या जागांपैकी ही एक जागा आहे. केवळ 594 चौरस फिट जागेवर बनलेले हे घर त्रिकोणी आकाराचे आहे. या जागेला आर्किटेक्‍ट मिजुशी यांनी असे काही बदलले आहे की, ते आता दुमजली मेंशन होम झाले आहे. 

अतिशय कल्‍पक पद्धतीने बांधले आहे 
या घरासाठी अत्‍यंत लहान आकाराचा एका कोप-यातील भूखंड मिळाला होता. मात्र मिजुशी यांनी आपल्‍या कल्‍पनाशक्‍तीद्वारे या जागेवर असे काही घर बांधले की, ज्‍याची कल्‍पना करणेही शक्‍य नव्हते. या घरात मिजुशी स्‍वत: आपली पत्‍नी व मुलीसोबत राहतात. यामध्‍ये बेडरुम ग्राउंड फ्लोअरवर आहे तर लिव्हिंग रुम फर्स्‍ट फ्लोअरवर आहे. घरात एक प्‍लेरुमदेखील बनवले आहे. एका मोठ्या खिडकीद्वारे घरात प्रकाशाची सोय करण्‍यात आली आहे. एक मॉर्डन किचन आणि बाथरुममुळे घराला अगदी अलिशान लुक मिळाला आहे. 
 
पुढील स्‍लाइडवर...आतून असे अलिशान आहे हे घर.. 

 
 
बातम्या आणखी आहेत...