आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकांनी उडवली जाडेपणाची खिल्ली, मुलीने असे कपडे परिधान करून दिले उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्लंडच्या केंटमध्ये राहणारी पॅरिस हार्वे फक्त 13 वर्षांची आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या फोटोंची सोशल साइट्सवर चर्चा झाली होती. जाडेपणामुळे ती सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळत होती. पण एकदिवस तिने तिच्या या भितीवर विजय मिळवण्याचा निर्णय घेतला. 

स्विमसूटमधील फोटो केला पोस्ट.. 
जाडेपणामुळे लोक पॅरिसची खिल्ली उडवायचे. आधी तिने या सर्वाला कंटाळून बाहेर जाणेच बंद केले. पण नंतर तिने सर्वाचा सामना करण्याचा निर्णय घेतला आणि थेट बिकिनी परिधान करून बीचवर गेली. एवढेच नाही, तर तिने तिचे काही फोटोदेखिल सोशल साइट्सवर शेयर केले. काही लोक पॅरिसचे यासाठी कौतुक करत आहेत तर काही खिल्ली उडवत आहेत. पण पॅरिस सर्व सकारात्मकपणे पाहत आहे. तिने हा कॉन्फिडन्स कायम ठेवणार असल्याचे म्हटले आहे. 

आजारामुळे वाढले वजन 
पॅरिसचे वजन एका आजारामुळे अगदी सहजपणे वाढते पण नंतर ते कमी होत नाही. त्याशिवाय जन्मापासून तिचा एक पाय मोठा आणि एक लहान आहे. त्यामुळे ती स्टीकच्या मदतीने चालते. शाळेतही इतर मुले पॅरीसची खूप खिल्ली उडवत असतात. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, पॅरिसने शेयर केलेले इतर PHOTOS 
बातम्या आणखी आहेत...