आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 दिवसांपूर्वी झाला होता मुलीचा मृत्यू, पण सोबत घेऊन पार्कमध्ये फिरायचे आई-वडील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोटच्या मुलांच्या मृत्यूमुळे आई वडिलांवर दुःखाचा केवढा डोंगर कोसळतो हे शब्दांत सांगणे तसे कठीण आहे. इंग्लंडच्या वेस्ट यॉर्कशायरमध्ये राहणाऱ्या 21 वर्षीय केर्लोट जेक्स प्रेग्नंसीमुळे खूप आनंदी होती. पण 20 व्या आठवड्यात तिला समजले ती तिच्या गर्भात असलेल्या बाळाची वाढ व्यवस्थित झालेली नाही. जन्मानंतर काही दिवसांत त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. पण मृत्यूनंतरही त्यांनी 16 दिवस तिचा मृतदेह सोबत ठेवला. 

पार्कमध्ये फिरायला न्यायचे.. 
केर्लोटसह तिचा पती अटिलाही या सर्वामुळे फार दुःखी झाला होता. केर्लोटने इव्हलिनला जन्म दिला पण तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. इव्हलिनचा मेंदू पूर्णपणे विकसित होऊ शकला नव्हता. त्यामुळे जिवंत राहण्यासाठी तिला व्हेंटिलेटरवर ठेवणे गरजेचे होते. जन्माच्या तिसऱ्या दिवशी इव्हलिनला डॉक्टरांनी तिच्या आई वडिलांच्या हातात दिले. इव्हलिनचे जगणे कठीण आहे हे डॉक्टरांनीर समजावल्यानंतर त्यांनी 4 आठवड्यांनी तिचे व्हेंटिलेटर काढण्याचा निर्णय घेतला. पण त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली आणि मुलीच्या मृत्यूनंतरही पुढचे 16 दिवस तिचा मृतदेह सोबत ठेवला. त्यावेळी ते तिला सोबत घेऊन पार्कमध्ये फिरायला जायचे. दोघांनी त्यादरम्यान इव्हलिनच्या बॉडीबरोबर फोटो क्लिक केले. मुलीबरोबर वेळ घालवण्यासाठी असे केल्याचे त्यांनी सांगितले. 

बॉडीवर होता खास मटेरियलचा कोट 
डॉक्टर्सने इव्हलिनची बॉडी कडल कोटद्वारे कव्हर केली होती. त्यामुळे बॉडी लवकर सडत नाही. त्यांनी इव्हलिनला 4 दिवस घरीच टेवले. त्याठिकाणी ते तिला तिच्यासाठी आणलेल्या खास बेडवर झोपवले. मृत्यूच्या 16 दिवसांनी तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

फेसबूकवर पोस्ट केले फोटो 
कपलने त्यांच्या मुलीबरोबर घालवलेल्या या क्षणांचे फोटो सोशल मीडियावर शेयर केले. त्यांचे दुःख समजणे तसे कठीण आहे, तरीही अनेक लोकांनी त्यांची स्टोरी शेयर केली. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, त्या 16 दिवसांतील इव्हलिनचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...