आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उघड झाले जगातील ‘डार्केस्ट बेबी’चे रहस्य, जाणून घ्या काय आहे खरी गंमत!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेस्क- काही दिवसांपूर्वी इंटरनेटवर एका काळ्या बाळाचा व्हायरल झाला होता. या बाळाला ‘डार्केस्ट बेबी इन द वर्ल्ड’ असे नाव देण्यात आले होते. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या बाळाचा हा फोटो आहे, असा दावा अनेकांनी केला होता. हे बाळ खरे आहे की खोटे यावरही चर्चा रंगली होती. आता या छायाचित्रामागील सत्य उघड झाले आहे. हे छायाचित्र मनुष्याचे नसल्याचे उघड झाले आहे.
बाळ नव्हे क्ले डॉल (Clay Doll)...
या फोटोत दिसत असलेल्या बाळाच्या त्वचेचा रंग काळा आहे, पण त्याच्या डोळ्यांचा रंगही काळा आहे. त्यामुळे त्याच्याबाबतची उत्सुकता प्रचंड वाढली होती. मात्र प्रत्यक्षात हे बाळ नसून पॉलिमर क्ले आर्टपासून तयार करण्यात आलेली एक बाहुली असल्याचे आता उघड झाले आहे. eBay या ई-कॉमर्स वेबसाइटने व्हॅलेंटाइन गिफ्ट म्हणून या डॉलची विक्री केली होती. या साइटवर अशाप्रकारच्या डॉल्स 50 ते 80 डॉलर (3 ते साडे पाट हजारांच्या घरात) मध्ये विक्रीस उपलब्ध आहेत. या डॉलला Ooak baby gorilla monkey Clay Doll असे नाव देण्यात आले होते. अशाप्रकारच्या डॉल्सच्या अनेक मॉडेल असून विविध रंगात त्या उपलब्ध आहेत. खरं तर हे काळ्या रंगाचे अगदी मनुष्यासारखे दिसणारे हे बाळ असून याचा जन्म दक्षिण आफ्रिेकेत झाला असावा, असा अंदाज बांधला गेला होता.
पियरसनची निर्मिती आहे काळा क्ले बेबी
या डॉलची निर्मिती आर्टिस्ट लीला पियरसनने केली आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार, "2005 मध्ये तिने या डॉलचे स्केच बनवायला सुरुवात केली होती. 2006 मध्ये याची ऑनलाइन विक्री सुरु केली. त्यानंतर ही डॉल फेमस झाली." इंटरनेटवर व्हायरल होण्याविषयी पियरसन म्हणते, "माझे हे आर्ट जगातील डार्केस्ट बेबी म्हणून व्हायरल होईल, याचा कधी मी विचारही केला नव्हता. मला जेव्हा याविषयी समजले, तेव्हा मी निराश झाले आणि मला प्रचंड चीडसुद्धा आली." पियरसनच्या ऑफिशिअल वेबसाइटवर आणि eBay वर अशाप्रकारच्या शेकडो क्ले डॉर्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
काय होता दावा...
सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो हा दक्षिण आफ्रिकेतील एका काळ्या बाळाचे फोटो असल्याचे म्हटले गेले होते. या बाळाच्या डोळ्याभोवतीची त्वचाही काळी असल्याने त्याला जगातील आठवे आश्चर्यही म्हटले गेले होते.
हे बाळ एलियन?
आजपर्यंत अशा प्रकारचे बाळ पाहिले नसल्याने हे बाळ एलियन असल्याच्याही चर्चा रंगू लागल्या होत्या. त्याची तुलना एलियन स्टोरीजशी केली गेली.. या बाळाबद्दलची भीती आणि उत्सुकता यामुळे याची लोकप्रियता वाढून जास्त चर्चा होऊ लागली होती.
सोशल मीडियावर चर्चा
हा फोटो व्हायरल झाल्यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली होती. हा फोटो खरा आहे की, खोटा यावरही चर्चेला उधाण आले होते. काही लोकांच्या मते हे दक्षिण आफ्रिकेत जन्मलेले मूल आहे, तर काही लोकांनी या फोटोला एडिटेड फोटो म्हटले होते. लोकांची उत्सुकता वाढवण्यासाठी हा फोटो तयार केल्याचा संशयही अनेकांनी व्यक्त केला होता.
गिनीज बुकने नाकारले होते
सोशल मीडियावर दावा करण्यात आला होता, की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या बाळाच्या नावाची नोंद आहे. मात्र गिनीज बुकने केलेल्या तपासणीत ही बातमी खोटी असल्याचे म्हटले होते. या फोटोला अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या व्हायरल बनवताहेत हे जाणून घेणे आवश्यक आहे, असे गिनीज बुकने म्हटले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहास Ooak baby Clay Doll चे अनेक PHOTOS, जे झाले होते व्हायरल...