आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे लोकांच्‍या शरीरातून काढले जातात भूतं, परंपरेच्‍या नावाखाली होते असे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेकांचा भूत, प्रेत या गोष्‍टींवर विश्‍वास नाही. मात्र असेही कित्‍येकजण आहेत ज्‍यांचा आत्‍म्‍याच्‍या अस्तित्‍वावर विश्‍वास आहे. फोटोग्राफर डेव्हिड टेसिंस्‍की यांना विषयी अधिक जाणुन घेण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. यासाठी त्‍यांनी अनेक ठिकाणी भटकंती करुन याचा अभ्‍यास केला. तेव्‍हा त्‍यांना माहिती मिळाली  की, इथोपियामध्‍ये अंगातील भूत बाहेर काढण्‍यासाठी चर्चद्वारे एक खास विधी केला जातो. याला एक्‍सॉर्सिझम (exorcism) म्‍हणतात.
 
फोटो काढण्‍यासाठी आल्‍या मोठ्या अडचणी 
आपल्‍या प्रवासाविषयी डेव्हिड लिहितात की, प्रथम मी त्‍या जागेविषयी माहिती मिळवली. नंतर पैसे जमा करुन तेथे जाण्‍याचे तिकीट काढले. इथोपियाच्‍या एडिस बाबा या ठिकणी मी पाहोचलो, मात्र पहिल्‍याच दिवशी मला लुटण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात आला. 2 आठवडे चर्चभोवती चकरा मारुनही डेव्हिड यांना काहीही आढळले नाही. नंतर त्‍यांना कळाले की, त्‍यांच्‍या घरापासून काही अंतरावर एक पादरी राहतो. तो त्‍याच्‍या घरीच भूतांना पळवून लावण्‍याच्‍या विधी करत असतो. नंतर डेव्हिड त्‍या पादरीकडे गेले तेव्‍हा त्‍यांना दिसले की, पादरीकडे 150 जण आले असून सर्वांना त्‍यांच्‍या अंगातील भूत काढायचे आहे. मात्र त्‍या सर्वांनी डेव्हिडला फोटो काढण्‍यापासून मज्‍जाव केला. 

दिसले असे दृश्‍य 
डेव्हिड त्‍या ठिकाणी गेले तेव्‍हा त्‍यांना सर्वत्र मोठमोठ्याने रडणारे लोक दिसले. त्‍या पादरीचे नाव मेमेहिर होते. त्‍याची चर्चमधून हकालपट्टी करण्‍यात आली होती. कारण त्‍याचे स्‍वत:चे उत्‍पन्‍न चर्चच्‍या उत्‍पन्‍नापेक्षा जास्‍त होते. या विधीसाठी पादरी लोकांकडून मोठी फीस घ्‍यायचा. लोकांचाही या पादरीवर प्रचंड विश्‍वास होता. लोक त्‍याच्‍याकडूनच हा विधी करुन घेत असे. 
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, या विधीचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...