आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे महिला नियमाविना बिनधास्त करतात फाइट, असा आहे ऑल फिमेल फाइट क्लब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलांची कुस्ती, जुडो, कराटे, जिउजित्सूच्या अनेक स्पर्धा होतात. ऑलिम्पिकमध्येही अशा खेळांचा समावेश आहे. पण बर्लिन (जर्मनी)च्या ऑल फिमेल फाइट क्लबमध्ये होणाऱ्या फाइट वेगळ्या असतात. येथे कोणताही नियम नसतो. हेवीवेट पहिलवान कराटेतील ब्लॅक बेल्टबरोबरही फाइट करू शकते. बर्लिनमध्ये राहणारी पोलंडची फोटोग्राफर कटरजायना मजूर हिने या फाइट क्लबमधील फोटो क्लिक केले आहेत. 

टॉपलेस होऊन करतात फाइट 
- अॅनाकोंडा आणि रेड डेवील नावाच्या दोन महिलांनी 2010 मध्ये या ऑल फिमेल फाइट क्लबची स्थापना केली होती. त्या रशियातून बर्लिनला येऊन स्थायिक झाल्या आहेत. 
- येथे होणाऱ्या फाइट्स फिमेल रेसलिंगपेक्षा वेगळ्या असतात, कारण याठिकाणी काहीही नियम नसतात. सर्वकाही फ्रीस्टाइल असते. - येथे फाइटची स्टाइल नसते किंवा कॅटेगरीही नसते. कोणीही, कुणाशीही आणि कशीही फाइट करू शकतो. वय, उंची, वजन याचेही बंधन नसते. 
- या क्लबमध्ये अनेक महिला टॉपलेस होऊन फाइट करतात. येथे शक्ती आणि आत्मविश्वास याची खरी स्पर्धा असते. 
- या फाइट क्लबमध्ये कोणी जजही नसतो. तासन् तास या फाइट चालतात. मध्ये ब्रेकही होतात. 
- याठिकाणचे मैत्रीपूर्ण वातावरण या क्लबचे वैशिष्ट्य आहे. ब्रेकमध्ये फाइट करणाऱ्या महिला पहिलवान एकमेकींबाबत माहिती घेतात. एखादीला जास्त दुखापत झाली तर फाइट थांबवली जाते. 

पुढील स्लाइड्सवर पाहा बर्लिनच्या ऑल फिमेल फाइट क्लबमधील फाइट करणाऱ्या महिलांचे आणखी काही PHOTOS.. 
बातम्या आणखी आहेत...