आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photographer Captures Mentawai Tribes In West Sumatra Of Indonesia

PHOTOS: फोटोग्राफरने दाखवली इंडोनेशियामधील जमातीची अशी LIFE

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर्काता- 19 वर्षीया मोहम्मद फॉजी चॅनिआगोम नावाच्या फोटोग्राफरने इंडोनेशियाच्या पश्चिम सुमात्रामध्ये राहणा-या जमातीचे फोटो क्लिक केले आहेत. उत्तर सुमात्रामध्ये राहणा-या फोटोग्राफने या लोकांसोबत चार दिवस घालवले आणि त्यांचे आयुष्य जवळून पाहिले. या जमातीला मेन्टावाई ट्राइब नावाने ओळखले जाते. हे लोक आपल्या शरीरावर विशेष प्रकारचे टॅटू गोंदवून घेतात. हे टॅटू त्यांची ओळख बनली आहे. त्यांचे दातसुध्दा खूप मजबूत असतात. एका फोटोमध्ये या समाजातील एक महिला सिगारेट ओढताना दिसते. 
 
त्यांची घरे बांबू, लाकूड आणि गवतापासून बनवलेले असतात आणि त्याला उमाज म्हटले जाते. हे लोक शिकार केलेल्या प्राण्यांच्या कवटीने घर सजवणे पसंत करतात. फोटोग्राफरने सांगितले, की हे लोक खूप मनमोकळे आणि आनंदाने येणा-या लोकांचे स्वागत करतात. काही रिपोर्ट्सच्या सांगण्यानुसार, मेन्टावाई जमातीच्या लोकांवर येत्या काही दिवसांत धोका निर्माण होऊ शकतो आणि त्यांची संख्या कमी होऊ शकते. हे लोक आधुनिक जगापासून स्वत:ला दूर आणि वेगळे ठेवणेच पसंत करतात. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या इंडोनेशियामधील या वेगळ्या जमातीची जीवनशैली...