आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे लग्नासाठी तरुणीवर करतात RAPE, घरचेसुध्दा देतात साथ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फरीदा आणि तिच्या मैत्रीणीला किडनॅप करताना काही तरुण - Divya Marathi
फरीदा आणि तिच्या मैत्रीणीला किडनॅप करताना काही तरुण
जगभरात अनेक अशा परंपरा आहेत, ज्या ऐकूनच अंगावर शहारे येतात. त्यातील काही परंपरा लोकांच्या मृत्यूशी संबंधित आहेत. अशीच एक परंपरा किर्गिस्तानमध्ये पाळली जाते. त्याला 'अला कचु' नावाने ओळखले जाते. त्या अंतर्गत तरुण आपल्या आवडत्या तरुणींना किडनॅप करून तिला लग्नासाठी समजावतात किंवा तिच्यावर बलात्कार करतात.
घरचेही देतात साथ...
जेव्हा येथे एखादा तरुण एखाद्या तरुणी किडनॅप करून घरी घेऊन जातो. तेव्हा त्याचे घरचेसुद्धा त्याच्या लग्नाची तयारी सुरु करतात. अनेकदा तरुणी लग्नासाठी नकार देतात. परंतु त्या तरुणाच्या घरचे तिची समजूत घालतात. तसेच अनेकदा तरुणीची समजूत घालण्यासाठी तो तरुण तिच्यावर बलात्कारसुध्दा करतो. दुस-या दिवशी सकाळी तरुणीसुध्दा लग्नाच्या तयारीला लागते. कारण तिला माहित असते, की तिच्यावर बलात्कार केलेल्या तरुणासोबतच तिचे लग्न होणार आहे.
मात्र, अनेकदा तरुणी लग्नासाठी तयार होत नाहीत. त्यावेळी पीडित तरुणीला तसेच सोडून दिले जाते. ज्यावेळी तिच्या चारित्र्यावर समाज बोट उचलतो, तेव्हा तिच्याशी कुणीच लग्न करत नाही. त्यावेळी तरुणीला बलात्कार केलेल्या तरुणाकडेच जावे लागते.
घातली होती बंदी...
सरकारने अनेकदा लग्नासाठी बलात्कार आणि किडनॅप करणा-या या परंपरेवर बंदी घातली होती. 1994मध्ये याला बेकायदेशीर म्हणून घोषित करण्यात आले होते. तरीदेखील ही परंपरा बंद पडली नाही. तेथील एका एनजीओच्या रिपोर्टनुसार, लग्नासाठी दरवर्षी जवळपास 12000 तरुणींचे अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार केला जातो. एका दुस-या आकड्यांनुसार, जवळपास 40% किर्गिस महिलांचे लग्न अशाच पद्धतीने झाले आहे. मात्र, अनेकदा तरुणींवर बलात्कार बोत नाही, परंतु तरुणाच्या घरचे अपहरण केलेल्या तरुणीची समजूत घालतात.
फोटोग्राफर दाखवली लाइफ...
जापानमध्ये टोकियाची रहिवासी फोटोग्राफर नोरिको हयाशीने या महिलांची लाइफ दाखवली आहे. नोरिकोने किर्गिस्तानच्या अनेक परिसरात बरेच दिवस घालवले. ही परंपरा जवळून पाहिली आणि जाणून घेतली. नोरिकोसोबत बातचीत करताना एका 82 वर्षांच्या महिलेने सांगितले, की अलीकडेच काही तरूण ओळख नसलेल्या तरुणींनासुध्दा किडनॅप करतात. हे चुकीचे आहे. आमच्या काळात तरुण-तरुणी एकमेकांना ओळख होते, पत्र देत होते, त्यानंतर अपहरण करत होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रिअल फोटो आणि संपूर्ण घटना....
बातम्या आणखी आहेत...