आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Amazing: Photographer Click Disney Princesses As Indian Brides

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PIX: भारतीय फोटोग्राफरने डिस्ने थीमवर कॅमे-यात कैद केला नववधूंचा खास अंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(भारतीय फोटोग्राफर अमृत ग्रेवाल यांनी क्लिक केलेले छायाचित्र)
सोशल मीडियावर नेहमीच आपल्याला वेगवेगळ्या अंदाजातील छायाचित्रे बघायला मिळत असतात. यापैकी काही छायाचित्रे सोशल मीडियावर प्रचंड बघितली जातात. चर्चेत राहणारी छायाचित्रे क्लिक करणे हे तसे फोटोग्राफर्ससाठी जिकिरीचे काम असते. प्रत्येक फोटोग्राफरची स्वतःची एक वेगळी अशी खासियत असते. कुणी वाइल्ड लाइफशी निगडीत छायाचित्रे क्लिक करण्यात तरबेज असतात तर काहींना अंडरवॉटर फोटोग्राफीची विशेष आवड असते. असेच एक भारतीय फोटोग्राफर असून त्यांचे नाव आहे अमृत ग्रेवाल. अलीकडेच त्यांनी भारतीय पोशाख परिधान केलेल्या मॉडेल्सना डिस्ने थीमवर नववधुच्या रुपात सादर केले आहे.
कॅनडातील व्हँक्युअर येथे वास्तव्याला असेलल्या अमृत यांना वैविध्यपूर्ण फोटोशूट करण्यासाठी ओळखले जाते. अमृत यांनी सांगितले, एका भारतीय क्लॉथिंग स्टोअरने माझ्याशी संपर्क साधला आणि एका मॅगझिनसाठी अॅडव्हर्टायजिंग कॅम्पेन करण्याची ऑफर दिली. याअंतर्गत भारतीय परिधान आणि डिस्ने थीमवर आधारित फोटोशूट करण्याची त्यांची इच्छा होती. गेल्या वर्षी मे महिन्यात आम्ही हे फोटोशूट सुरु केले होते. हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी मला दोन महिन्यांचा कालावधी लागला. एडिटिंगमध्ये आम्हाला बराच वेळ लागला. या फोटोशूटमध्ये आम्ही डिस्ने थीमवर मॉडेल्सना भारतीय नववधूंच्या रुपात सादर केले आहे.
या फोटोशूटदरम्यान एरिअल फोटोग्राफी केल्याचेही अमृत यांनी सांगितले. एरिअल फोटोग्राफीची छायाचित्रे लवकरच सादर करणार असून या फोटोशूटला मिळालेल्या यशामुळे आनंदी असल्याचे अमृत म्हणाले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अमृत ग्रेवाल यांनी डिस्ने थीमवर क्लिक केलेली खास छायाचित्रे...