आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात रहस्यमय देश, जीवाची बाजी लावून फोटोग्राफरने कैद केले Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या देशात अल्कोहोल बॅन आहे, मात्र या दुकानात ही महिला स्नेक वोडका विक्री करत आहे. - Divya Marathi
या देशात अल्कोहोल बॅन आहे, मात्र या दुकानात ही महिला स्नेक वोडका विक्री करत आहे.
या देशात अल्कोहोल बॅन आहे, मात्र या दुकानात ही महिला स्नेक वोडका विक्री करत आहे. 
नॉर्थ कोरिया असा गुढ देश आहे की येथे काय चालते हे फक्त त्या देशातील लोकांनाच माहित आहे. मात्र तरीही बर्लिन येथील मार्टिन वोन डॅन द्रिएच्श याने नॉर्थ कोरियाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना चकमा देऊन येथील काही दृष्य कॅमेरात कैद केले आहे. 
 
नॉर्थ कोरियाये रहस्य कसे आणले बाहेर.. 
- जगभरातील असे अनेक फोटोग्राफर्स आहेत जे जीवाची बाजी लावून या देशात येतात आणि येथील सत्य परिस्थिती फोटोच्या माध्यमातून जगासमोर आणतात. 
- मार्टिन हा अशाच फोटोग्राफर्सपैकी एक आहे. तो एका पर्यटकांच्या ग्रुपबरोबर 2014 मध्ये येथे आला होता. मात्र त्याने आता हे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहेत. 
- नॉर्थ कोरियामध्ये जाण्यापूर्वी आणि तेथून बाहेर येताना पर्यटकांचे सामान आणि लॅपटॉप चेक केले जाते. त्यामुळे येथील फोटो बाहेर येण्याची शक्यताच नसते. 
 
मग कसे बाहेर आले फोटो 
- मार्टिनला पूर्ण जाणीव होती की नॉर्थ कोरियाचा हुकूमशहा किम जोंग आणि त्याच्या फौजेच्या नजरेतून येथे क्लिक केलेले फोटो सुटू शकत नाही. 
- चीनच्या पर्यटकांसोबत दाखल झालेल्या मार्टिनने एका हिडन मेमरी कार्डमध्ये फोटो सेव्ह केले होते. त्यामुळे बॅन असतानाही त्याने फोटो क्लिक केले आणि ते बाहेरही घेऊन आला. 

फोटोज् मध्ये दिसला नॉर्थ कोरियाचा वेगळाच अंदाज 
- आतापर्यंत असे मानले जाते की नॉर्थकोरियात लोकांसोबत खूप अत्याचार होतात. मात्र मार्टिनच्या फोटोज मधून या देशातील नयनरम्य समुद्रकिनारे, शांततापूर्ण आयुष्य जगणारे लोक पाहायला मिळतात.  
बातम्या आणखी आहेत...