आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या किन्नरला 12 व्या वर्षी हाकलले होते घरातून, उदरनिर्वाहासाठी बनली होती सेक्स वर्कर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात किन्नरांचे जीवन किती कठीण असते हे कोणापासूनही लपलेले नाही. LGBTQ कम्युनिटी त्यांच्या अधिकारांसाठी संघर्ष करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीचे फोटोग्राफर जावेद सुल्तान यांनी ट्रांसजेंडर मॉडेल निहारिका यांचे जीवन फोटोंच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 

अशी आहे निहारिकाची स्टोरी...
निहारिकाचा जन्म 1993 मध्ये नेहाल सिंहच्या रुपात झाला होता. 12 वर्षाच्या वयात त्याच्या कटुंबीयांना समजले की, तो मुलगा नसून ट्रान्सजेंडर आहे. हे समजल्यानंतर त्यांनी त्याला घराबाहेर काढले. शाळेतूनही काढण्यात आलेल्या निहारिकाला लोक टोमणे मारायचे आणि तिच्यापासून चार हात लांब राहणेच पसंत करायचे. वयाच्या 12 व्या वर्षी आत्महत्या करण्याचा तिने प्रयत्न केला होता, पण ती वाचली. काही वेळाने निहारिकाची ओळख सामाजिक कार्यकर्ते क्रिश यांच्याशी झाली. त्यांनी निहारिकाला नैराश्यातून बाहेर येण्यात मदत केली आणि त्यानेच तिला निहारिका असे नावही गिले. 

कठीण होता प्रवास... 
निहारिकाला सुरुवातीच्या काळात सेक्स वर्कर बनून उदरनिर्वाह करावा लागला होता. 2011 मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर निहारिकाने तिच्या दोन बहिणी आणि आईची काळजी घ्यायला सुरुवात केली. तिने फॅशन मॉडेल म्हणून कामाची सुरुवात केली. 

प्रियकराबरोबर राहते निहारिका... 
सुरुवातीला निहारिकाला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. पण आज मॉडेल म्हणून तिचे करिअर जोरावर आहे. तिचे खासगी जीवनही सध्या चांगले सुरू आहे. निहारिका दिल्लीमध्ये ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणाऱ्या अंकुशबरोबर राहते. अंकुशच्या कुटुंबीयांना दोघांचे नाते मान्य आहे. दोघे दिल्लीत सोबतच राहतात. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, निहारिकाचे पर्सनल PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...