आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनच्या फोटोग्राफरने दाखवली आफ्रिकेतील नाईल नदीच्या किना-यावरील लोकांची LIFE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोग्राफर लेव्हिसन वुडद्वारा आफ्रिकेमध्ये क्लिक करण्यात आलेल्या फोटोंचा कोलाज)
ब्रिटनचा रहिवासी फोटोग्राफर लेव्हिसन वुडने आपल्या नवीन फोटो सीरिजमध्ये मॉडर्न आफ्रिकेच्या वाइल्डलाइफ, जमाती आणि तेथील सण दाखवले आहेत. त्याच्या या फोटो सीरिजचे नाव 'विजन ऑफ आफ्रिका' आहे. या सीरिजमध्ये त्याने जगातील सर्वात मोठी नदी नाईलच्या किना-यावर विविध ठिकाणच्या लोकांचे आयुष्य दाखवले आहे. लेविसनने सतत 9 महिन्यांपर्यंत राहून या फोटो सीरिजला तयार केले आहे. अलीकडेच लंडनमध्ये त्याच्या या फोटो सीरिजचे प्रदर्शन लावण्यात आले आहे.
यामध्ये काही फोटोंमध्ये नाईल नदीच्या किना-यावर गायींसोबत मुले दिसत आहेत तर काही फोटोंमध्ये सण साजरा करताना लोक दिसत आहेत. तसेच काही फोटोंमध्ये लोकांचे कठिण आयुष्य दाखवण्यात आले आहे. लेव्हिसनने सांगितले, की या सीरिजदरम्यान मला मॉडर्न आफ्रिकेचे काही रंग दिसले, जे अद्भूत आहेत. मी नाईल नदीच्या किना-यावर रवांडापासून सहारा वाळवंटापर्यंत फोटोग्राफी केली आहे. माझ्यासाठी हा एक मोठा प्रवास होता, त्यामध्ये मला आफ्रिकेच्या इतिहासका-यांच्या दृष्टीकोणातून पाहण्याची संधी मिळाली.
लेव्हिसनने पुढे सांगितले, की एक पर्यटक म्हणून मला यांचे फोटो टिपणे खूप मोठे आव्हान होते. परंतु ते मी करून दाखवले. ही गोष्ट माझ्यासाठी गर्वाची आहे. यादरम्यान मी जगातील सर्वात लांब नाईल नदीसोबत आफ्रिकेची यात्रा केली. खरंच हे शानदार क्षण होते. लेव्हिसन वुड ब्रिटीश पॅराशूट रेजीमेंटचा माजी अधिकारी आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा फोटोग्राफरने नाईल नदीसह क्लिक केलेले PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...