आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये चिमुकल्यांना दिली जाते वेदनादायी ट्रेनिंग, ओलांडतात क्रूरतेच्या मर्यादा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिजींग- चीनमध्ये मुलांना मजबूत करण्याच्या नावाखाली कठोर ट्रेनिंग दिली जाते. यादरम्यान मुले रडतात, ओरडतात, केवीलवाणे होऊन बसतात, मात्र त्यांच्यावर जराही दया केली जात नाही. त्यांना क्रूर पध्दतीने प्रशिक्षण दिले जाते. यापूर्वीसुध्दा अशाप्रकारचे फोटो अनेकदा समोर आले आहेत. अलीकडेच चीनच्या अन्हुई प्रांताच्या बोझोऊ सिटीमध्ये स्थित जिन्मास्टिक समर स्कूलमध्ये मुलांना दिल्या जाणा-या क्रूर ट्रेनिंगचे फोटो समोर आले आहेत. या फोटोमध्ये ट्रेनिंगदरम्यान मुले वेदनेने ओरडताना स्पष्टपणे दिसत आहे.
जिन्मास्टिक समर स्कूलसाठी संपूर्ण देशातून अशा मुलांची निवड केली जाते, जे वयापेक्षा जास्त मजबूत असतात. त्यानंतर त्यांची ट्रेनिंग सुरु केली जाते. त्यामध्ये मुलांना पाय पसरवणे, हातवर पूर्ण शरीराचा तोल सांभाळण्यासारखे अनेक भयंकर स्टंट शिकवले जातात. अशी ट्रेनिंग मुलांवर अत्याचार केल्यासारखीच आहे, तरीदेखील पालक मुलांना या शाळेत पाठवतात. त्यांच्या सांगण्यानुसार, अशा ट्रेनिंगमुळे मुले मजबूत होतात सोबतच त्यांची इच्छाशक्तीसुध्दा वाढते.
ऑलम्पिकसाठी तयार केले जातात मुले-
ओलम्पिक खेळासाठी चीनचे प्रदर्शन दिवसेंदिवस उत्कृष्ट होत आहे. लोकांचे म्हणणे आहे, की अशा क्रूर ट्रेनिंगमुळेच ते शक्य झाले आहे. 2012च्या ओलम्पिकमध्ये चीनने एकूण 88 पदके जिंकली होती, त्यामध्ये 38 सुवर्णपदके होती. चीन सरकारसुध्दा अशा ट्रेनिंगला योग्य मानतात. सरकार अशा मुलांची निवड करते जे खेळामध्ये अधिक रुची ठेवतात. त्यानंतर त्या मुलांना त्यांच्या आवडीच्या खेळात ट्रेनिंग देऊन पारंगत केले जाते. यादरम्यान ट्रेनर क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या लहान मुलांना कशी दिली जाते क्रूर ट्रेनिंग...