आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photographs Of Amsterdam Grocer Green Lights Disco Shopping

'मॉल बंद' होताच सुरु होते डिस्को पार्टी, बेधुंद नाचतात तरुण-तरुणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मॉलमध्ये शॉपिंग करत असताना पार्टी करताना तरुणी)
नेदरलँडच्या एम्सटर्डम शहराच्या 'द डर्क व्हॅन डेन ब्रोएक' सुपरमार्केट तेथील लोकांमध्ये खूप प्रसिध्द आहे. कारण येथे डिस्को शॉपिंग सुरु करण्यात आली आहे. हे मार्केट रात्री आपल्या निश्चित वेळेवर बंद होते, त्यानंतर डिस्को ग्रॉसरी पार्टी सुरु होते.
एका तासासाठी मार्केट पुन्हा नवीन रंगारुपात सुरु होते. मार्केट नाइट क्लबमध्ये रुपांतरित होते. लोक शॉपिंगसोबत डान्ससुध्दा करतात. सुपरमार्केट व्यवस्थेला डिस्को मार्केटची कल्पना एका विद्यार्थ्याच्या संदेशाने आली. त्याच्या फेसबुकवर लिहिले होते, की शॉपिंगसोबत डिस्कोची सुविधा असेल तर मार्केटचा त्यात फायदा होईल.
सुपरमार्केट व्यनस्थापकांनी फेसबुकवर एक इव्हेंट पेज तयार केले आहे. यावर लोक रजिस्ट्रेशन करावे लागत होते. त्यात 1200 लोकांनी नोंदणी केली. मात्र 500 लोकांनाच या पार्टीत एंट्री मिळाली. अट होती, की तुम्हाला कमीत कमी 500 रुपयांचे सामान खरेदी करावे लागेल. याची यादी इव्हेंट पेजवर दाखवावी लागेल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या डिस्को शॉपिंगची छायाचित्रे...