आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे आशिया खंडातील सर्वात मोठा रेड लाइट एरिया, येथे राहतात 14 हजार महिला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेश्यावृत्ती म्हटले, की प्रत्येकाच्या तोंडून 'बदनाम गली' हा शब्द बाहेर पडतो. अशीच एक 'बदनाम गली' कोलकाता, पश्चिम बंगालमधील सोनागाछी येथे आहे. या परिसरात 14 हजारांपेक्षा जास्त महिला वेश्यावृत्ती करतात. सतत चेह-यावर मेकअप थोपणा-या महिला, गल्लीत खेळणारी त्यांची लहान-लहान मुले, खोलींमध्ये वाट पाहणा-या महिला, हे सोनागाछी गल्लीमधील रोजचे दृश्य आहे. येथे अनेक मजल्यांवर वेश्यावृत्ती चालते. येथे अनेक महिला स्वत: , तर काही नाइलाजाने येतात. काही महिला आणि मुलींना येथे जबरदस्तीने ढकलले जाते.
कोलकात्याला 'सिटी ऑफ जॉय' म्हटले जाते. या शहरातील या वेश्यालयामध्ये जवळपास 18 वयाखालील 12 हजार मुली काम करतात. फोटोग्राफर सुजोत्रा घोषने येथील काही निवडक फोटो क्लिक केले आहेत. कोलकातामधील या वेश्यालयावर एक सिनेमादेखील बनवण्यात आला आहे. Born Into Brothels नावाच्या या सिनेमाला ऑस्करमध्ये सन्मानित करण्यात आले होते.
सोनागाछीमध्ये राहणा-या महिला एका दिवसाला 124 रुपये कमवतात. यांच्या चेह-यावर हास्य दिसत असले, तरी त्यांचे आयुष्या तितके सुखी नसते. त्यांनी या वेश्यावृत्तीलाच आपले जीवन मानले आहे. या परिसरात इतर सामान्य लोकांना प्रवेश नाहीये. त्या पत्रकार किंवा फोटोग्राफर्सनादेखील आत प्रवेश देत नाहीत. अनेक सामाजिक संस्था या महिलांसाठी काम करतात. त्यांना एड्स आणि इतर आजारांपासून दूर ठेवण्याचा या संस्था प्रयत्न करतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या आशिया खंडातील सर्वात मोठ्या रेड लाइट एरियामधील PHOTOS

सौजन्य- डेली मेल