आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photos Captured When Wild Dogs Attack Hyena In South Africa

जेव्हा रानमांजरीला मारण्यासाठी जंगली कुत्र्यांनी केला हल्ला, क्लिक झाले PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रानमांजरीवर जंगली कुत्र्यांनी केला हल्ला
केपटाऊन- एका ऑस्ट्रेलिअन फोटोग्राफर मार्ल मोलने सेबी सँड रिझर्व्हमध्ये काही जंगली कुत्र्यांनी एका रानमांजरावर हल्ला केल्याचे काही फोटो क्लिक केले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या एका रिझर्व्हमध्ये कुत्र्यांच्या कळपाने रानमांजरीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. बराचवेळ या कुत्रा आणि रानमांजरींमध्ये लढत सुरु होती. समोर एक नदी होती, त्यामध्ये रानमांजरीने प्राण वाचवण्यासाठी उडी मारली. जंगली कुत्र्यांना पाण्यात जाण्यासाठी भिती वाटते. म्हणून अनेकदा ते आपल्या शिकारीला कोणत्याही परिस्थितीत पाण्यात जाऊ देत नाहीत.
मात्र यापूर्वी रानमांजरने उलटवार करून कुत्र्यांना भिती दाखवण्याचा प्रयत्न केला. दक्षिण आफ्रिकेत आढळणारे जंगली कुत्रे खूप भयावह असतात. आपल्या शिकारीला काही क्षणांतच मारून टाकतात. हे जंगली कुत्रे अनेक आपल्यापेक्षा आकाराने मोठ्या प्राण्यांचीसुध्दा शिकार करतात. फोटोग्राफरने सांगितले, की रानमांजरीचा कुत्र्यांनी आधी पाठलाग केला आणि नंतर तिला चारही बाजूंनी घेरले. परंतू काही क्षणांतच रानमांजरीने पाण्यात उडी टाकली.
56 वर्षांच्या फोटोग्राफरने सांगितले, की रानमांजर यावेळी आरडाओरड करत होती. मात्र अखेरपर्यंत तिने हार मानली नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या घटनेचे PHOTOS...