आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photos From Town Abandoned After Radiation 30 Years Ago In Ukraine

NEW PHOTOS: जगातील सर्वात मोठ्या अणुबॉम्बच्या विस्फोटाने शहर झाले होते उध्वस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(घटनेच्या 30 वर्षांनंतर एका घरातील दृश्य)
कीव (यूक्रेन)- जगातील सर्वात मोठ्या अणुबॉम्ब अपघातने उध्वस्त केलेल्या शहराचे काही फोटो समोर आले आहेत. 35 वर्षीय एका फोटोग्राफरने यूक्रेनच्या नो-गो-जोनचा दौरा केला. इथे कुणाला जाण्याची परवानगी दिली जात नाही. पेशाने क्लर्क, परंतु फोटोग्राफीचा छंद असलेला रोलान्ड वेरंटने मागील 5 वर्षांत 7वेळा यूक्रेनवारी केली. अलीकडेच त्याने 42 दिवस तिथे घालवल्यानंतर काही फोटो सादर केले आहेत.
जवळपास 30 वर्षांपूर्वी 1986मध्ये यूक्रेनमध्ये सर्वात मोठे अणु बॉम्ब विस्फोटाची घटना घडली होती. चेर्नोबिल पॉवर प्लांटमध्ये झालेल्या विस्फोटाने अणुभट्टीचे छत उडाले होते. पावर प्लांटपासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर वसलेले यूक्रेनचे प्रिपयाट शहर उध्वस्त झाले होते. फोटोग्राफरने शहरातील तुटलेले पलंग, रिकामे स्विमिंग पुल, ओसाड पडलेले रुग्णालये, घरांचे चित्र दाखवले आहे. जवळपास 50 हजार लोकसंख्या असलेले हे शहर विस्फोटापूर्वी मॉडर्न आर्किटेक्चर म्हणून ओळखले जात होते. याला व्हिजन ऑफ फ्यूचर म्हणून सरकार सादर करत होती.
फोटोग्राफरला विस्फोट झालेल्या ठिकाणी जाण्यास परवानगी मिळाली नाही. त्याने सांगितले, की फोटो टिपताना अनेक नियम सांगण्यात आले होते, ते स्वीकार केले नसते तर अपघात झाला असता.
फोटोग्राफरच्या छायाचित्रांत विस्फोटाचे भयंकर रुप दाखवण्यात आले आहे. काही छायाचित्रांत निसर्ग हळू-हळू आपल्या जखमा भरण्याचा प्रयत्न करत असल्याचे दाखवण्यात आहे.
किती मोठा होती ही घटना-
या घटनेत ज्या किरणोत्सारी किरण निघाल्या त्या हिरोशिमा आणि नागासाकीवर पाडण्यात आलेल्या अणु बॉम्बपेक्षा 100 पट जास्त होत्या. घटनेच्या काही क्षणांत ३२ लोकांचा मृत्यू झाला होता. 38 लोकांचा किरणोत्सारी किरणांमुळे आजारी पडून मृत्यू झाला. याचा सरळ परिणाम यूक्रेन, बेलारुस आणि रशियामध्ये झाला होता. या घटनेमुळे 2 लाख लोकांना स्थलांतर करावे लागले होते. 6 लाख लोक किरणोत्सारी किरणांचे शिकार बनले होते. एका रिपोर्टनुसार, किरणोत्सारी पदार्थाचे शिकार झाल्याने 4 हजार लोकांना कर्करोग झाला आणि त्यांचा मृत्यू झाला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या घटनेचे PHOTOS...