आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवसा सामसूम पण रात्रीच्या वेळी असा असतो बँकॉकच्या रस्त्यांवरचा नजारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकॉक - थायलंडची राजधानी बँकॉकमधील हे रंगीत नजारे फोटोग्राफर मॅसिज यांनी टिपले आहेत. कार्डिफची नाईटलाईफ कव्हर करणाऱ्या मॅसिज यांनी नेहमी लगबग असलेल्या बँकॉकच्या रस्त्यांची निवड केली. या फोटोंमध्ये दिसणाऱ्या रस्त्यांवरील रंगत पाहता ब्रिटनच्या एखाद्या मोठ्या शहरातील हे चित्र असल्याचे जाणवते. 2012 ते 2015 या दरम्यान फोटोग्राफरने हे फोटो टिपले आहेत.
 

नाइटलाइफच्या चाहत्यांसाठी स्वर्ग
हे शहर नाइटलाइफच्या चाहत्यांसाठी स्वर्गासमान आहे. दरवर्षी जगभरातील विद्यार्थी याठिकाणी मौज करण्यासाठी येत असतात. फोटोग्राफर मॅसिज हेदेखिल असेच पोहोचले होते. रॉयल पॅलेसजवळ असलेल्या खाओ सान रोड परिसरातील एका हॉटेलमध्ये ते थांबले. हा स्पॉट अनेक वर्षांपासून पॉप्युलर टुरिस्ट्स स्पॉट बनला आहे. हॉटेलच्या बाहेर दिसणाऱ्या या झगमगत्या नाईट लाइफला कॅमेऱ्याने टिपण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही.

 
दिवसा सामसूम असतो रस्ता
मैसिज यांनी सांगितले की, जर तुम्ही याठिकाणी नवे असाल तर येथे तुमच्यासाठी करण्यासाठी नेहमी काही ना काही असते. दिवसा याठिकाणी त्यामानाने थोडी शांती असते. पण रात्री रस्त्यावर नाइट मार्केटची रंगत स्पष्ट दिसते. वीकेंड्सला या परिसरात गर्दीत सुमारे दुपटीने वाढ होते. लोकल थाई युवकही यात सहभागी होतात.
 
पुढील स्लाइड्समध्ये पाहा बँकॉकमधील या Night Life चे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...