आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Saddest Goodbye: Photos Of Dying Babies With Their Parents

Saddest Goodbye: मृत्यूशय्येवर असलेल्या बाळासोबतची आईवडिलांची हृदयस्पर्शी छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(नवजात बालकांची आपल्या पालकांसोबतची हृदयस्पर्शी छायाचित्रे)

आज आम्ही तुम्हाला जी छायाचित्रे दाखवत आहोत ती पाहून तुम्ही भावूक होऊन जाल. ही छायाचित्रे अशा नवजात बाळांची आहेत, जी जन्मताच या जगाचा कायमचा निरोप घेणार आहेत. आपले नुकतेच जन्माला आलेले बाळ एखाद्या आजारामुळे या जगातून कायमचे निघून जाणार हे कळल्यानंतर एखाद्या आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकून जाईल. त्या आईवडिलांसाठी यापेक्षा दुसरा कुठला मोठा आघात असूच शकत नाही.

'नाऊ आय ले डाऊन टू स्लीप' ही अशी एक संस्था आहे, जी आपल्या फोटोग्राफर्सना अशा पालकांकडे पाठवते, ज्यांची मुले टर्मिनली इल असून लवकरच मृत्युला कवटाळणार आहेत. या संस्थेच्या मते, आपले बाळ आपल्या आयुष्यातून कायमचे निघून जाणार हे ज्या आईवडिलांना ठाऊक असते, त्यांच्यासाठी त्या मुलासोबतचा प्रत्येक क्षण अनमोल असतो. हे शेवटचे क्षण कॅमे-यात कैद करुन आयुष्यभर जतन करुन ठेवले जातात. अमेरिकेत ही संस्था गेल्या शंभर वर्षांपासून कार्यरत आहे. 40 राष्ट्रांमध्ये या संस्थेच्या शाखा आहेत. या सर्व छायाचित्रांमध्ये दिसणारे नवजात बाळ हे एखाद्या आजाराने ग्रस्त असून त्या आजारावर कुठलाही उपचार शक्य नाही. ही सर्व छायाचित्रे कुणालाही भावूक करणारी आणि हृदयस्पर्शी आहेत. ही सर्व छायाचित्रे डेलीमेलवरुन साभार घेण्यात आलेली आहेत.

पुढील स्लाईड्सवर पाहा, हृदय पिळवटून टाकणारी नवजात बाळांची, त्यांच्या मातापित्यांची छायाचित्रे...