आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय वंशाच्या तरुणीने केला समलैंगिक विवाह, दोन वर्षांनी समोर आले Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वाती राव आणि कॅथरीन यांचे लग्नातील PHOTO. - Divya Marathi
स्वाती राव आणि कॅथरीन यांचे लग्नातील PHOTO.
स्वाती राव या भारतीय वंशाच्या तरुणीने कॅथरीन नावाच्या तरुणीबरोबर समलैंगिक विवाह केल्याचे समोर आले आहे. यूसी डेव्हीस याठिकाणी शिक्षण सुरू असताना स्वाती आणि कॅथरीन यांची भेट झाली. हळू-हळू त्यांची मैत्री वाढली आणि हीच मैत्री घट्ट नात्यात रुपांतरीत झाली आहे.

स्वाती व्हलेंसिया येथे लहानाची मोठी झाली. हायस्कूल शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती स्टँडफोर्डला अँथ्रॉपॉलॉजीचे शिक्षण घेण्यासाठी गेली. त्यानंतर ती यूसी सॅन डिएगोला वैद्यकीय शिक्षणासाठी गेली. त्याचठिकाणी तिची कॅथरीनबरोबर भेट झाली. कॅथरीन कॅलिफोर्नियात राहते. तिला आई, वडील आणि बहीण असे संपूर्ण कुटुंब आहे. स्वाती सेकंड इअरला असताना तिची कॅथरीनबरोबर भेट झाली. कॅथरीनने स्वातीला अगदी फिल्मी स्टाइलने संपूर्ण खोलीत कँडल लावून प्रपोज केले होते. त्यानंतर दोघींनी एकमेकींसाठी प्रेम व्यक्त केले. त्यानंतर हिंदु वैदिक पद्धतीने त्या दोघींचा विवाह झाला.

दोघींनी सर्व विचार आणि नियोजन करून विवाह केला. त्यांच्या विवाहाला पुढील महिन्यात दोन वर्ष पूर्ण होत आहेत. 8 नोव्हेंबर 2014 रोजी त्या दोघी विवाहबंधनात अडकल्या होत्या. विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या संपूर्ण लग्नाच्या नियोजनासाठी एक बेवसाइट तयार केली आहे. त्यावर त्या भेटल्या कशा, त्यांची वैयक्तीक माहितीही दिली आहे.

स्वाती आणि कॅथरीनचा Wedding Album पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइडवर..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...