प्रायव्हेट जेट आणि हेलिकॉप्टरमध्ये फिरण्यापासून ते महागडी दारु पिण्यापर्यंत जर्मनीतील म्युनिकमधील रिच किड्स अशाप्रकारे लाइफ एन्जॉय करत आहेत. नुकतेच इन्स्टाग्रामवरील रिच किड्स ऑफ म्युनिक या अकाऊंटवर या रईसजाद्यांचे फोटो अपलोड करण्यात आले आहेत.
प्रायव्हेट जेटमध्ये फिरणे, महागडी दारु पिणे, पैशांची उधळपट्टी करणे अशी या रिच किड्सची लाईफ आहे. म्युनिकचे हे रईसजादे अशीच लॅव्हीश लाईफ जगतात. इन्स्टाग्रामवर त्यांच्यापैकी काहींनी फोटो शेयर केले आहेत. त्यात कोणी स्विमिंग पूलमध्ये महागडी दारु पित असल्याचे दिसत आहे, तर कोणी हातात बंदूक घेऊन फोटो काढत असल्याचे पाहायला मिळाले. सर्व फोटोमध्ये यंगस्टर्स दिसत आहेत. कोणाकडे लाखो डॉलर आहेत कोणाकडे ब्रँडेड कार्स तर कुणाकडे प्रायव्हेट जेट. इन्स्टाग्रामवर यांचे अनेक फॉलोअर्स आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, असेच काही आणखी Photos..