आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photos Show Future Of Habitat On Mars Built By Robots

मंगळावर अशी असू शकतात \'घरे\', समोर आले एका प्रोजेक्टचे PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मंगळावर असे घर उभे राहू शकते. नासाच्या शॉर्टलिस्ट केलेल्या एका प्रोजेक्टमध्ये असे दाखवण्यात आले आहे.)
ब्रिटीश आर्किटेक्ट्सचा एक प्रोजेक्ट फोटो समोर आला आहे, त्यामध्ये दाखवण्यात आला आहे, की मार्सवर कशाप्रकारे लोक किंवा वैज्ञानिक राहू शकतात. फोस्टर प्लस पार्टनर्स नावाच्या आर्किटेक्ट्स फर्मच्या या प्रोजेक्टला नासाच्या 3डी प्रिंटेड हॅबिटेट चॅलेंजच्या टॉप-30मध्ये शॉर्टलिस्टसुध्दा करण्यात आले आहे.
फोटोमध्ये दाखवण्यात आले आहे, की 3डी प्रिंटींग रोबोटच्या मदतीने मार्सवर राहण्यालायक घरे बनवली जाऊ शकतात. जर या प्रोजेक्टवर काम करण्यात आले, तर माती आणि खडकांच्या मदतीने मंगळावर घरे उभे राहू शकतात. याअंतर्गत प्री प्रोगाम रोबोटला पाठवण्यात येणार आहे, जे एस्ट्रोनॉटच्या आधी तेथे पोहोचून घरे बनवण्याचा प्रयत्न करू शकतात. रोबोट सर्वात पहिले, 1.5 मीटर खोल खड्डा खोदणार आहे. त्यानंतर त्यामध्ये काही खास पदार्थ टाकणार आहे, जेणेकरून घराच्या पाया मजबूत होऊ शकेल.
रोबोटला अशाप्रकारे तयार करण्यात येईल ज्यामध्ये मनुष्याला कमीत कमी इंस्ट्रक्शनची गरज असेल. कारण मंगळाचे पृथ्वीपासूनचे अंतर खूप जास्त आहे आणि इंस्ट्रक्शन पोहण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या प्रोजेक्टचे फोटो...