आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ना जमीन ना नागरिकत्व, पाण्यावर आयुष्य काढताय हे लोक, पाहा त्यांची LIFE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बडजाओ समुदयाचे मुले समुद्रात राहतात)
एका फोटोग्राफरने समुद्रातील जनजातीच्या मुलांचे आयुष्य कॅमे-यात क्लिक केले आहे. पोलिश फोटोग्राफर डेव्हिड कॅसलिकोवस्कीने सांगितले, की बोर्नियाजवळ राहणारे बडजाओ समुदयाच्या लोकांचे आयुष्य आता धोक्यात आहे. त्यांचे अस्तित्व संकटात आले आहे. फोटोग्राफरच्या सांगण्यानुसार, पूर्वी हे लोक बोर्निया, इंडोनेशिया आणि फिलिपीन्सच्या समुद्रात सहज ये-जा करू शकत होते. परंतु आता यावर सक्ती केली जाऊ शकते. या लोकांकडे स्वत:ची जमीन नाहीये आणि कोणत्याच देशाचे नागरिकत्व नाहीये. म्हणून हे लोक पाण्यावर राहतात. या समुदयाचे मुले चंचल आहेत आणि समुद्रात शिकार करणे आणि कमी वयातच बोट चालवण्याचे त्यांच्याकडे ज्ञान असते.
फोटोग्राफरने सांगितले, की ही मुले शिक्षण आणि आरोग्यासारख्या सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांच्या युवापिढीचे भविष्यसुध्दा जैसे थे आहे. हा समुदाय जवळपास 200 वर्षांपासून बोर्नियाच्या किना-यावर राहत आहे. हे लोक चांगले गोताखोर आहेत आणि समुद्रात शिकार करणेसुध्दा यांच्यासाठी सोपे झाले आहे. ते समुद्राच्या तळात तंरगून हाताने मासे पकडू शकतात. अॅडव्हेंचर आणि आऊटडोर फोटोग्राफीमध्ये रुची असलेल्या डेव्हिडने या लोकांसोबत बराच वेळ घालवला आणि त्यांचे फोटो क्लिक केले. त्याने या सीरिजला 'यूनिक वे ऑफ लाइफ' म्हणून संबोधले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या समुदयाचे खास PHOTOS...