आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या गावातील घरांमध्ये आपोआप लागते आग, अजूनही कायम आहे त्यामागचे गूढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इटलीच्या एका गावात आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. या गावात 2004 पासून अचानक आग लागण्याच्या घटना घडत आहे. या गावाचे नाव व्हॅली ऑफ कॅनेटो डी कॅरोनिया असे आहे. यागावात कारपासून ते बेडपर्यंत अनेक अशा वस्तू आहेत, ज्यांना अचानक आग लागण्याच्या घटना घडत आहेत. 

रोज घडते एक घटना... 
इस गावात रोज काही तरी जळण्याची किमान एक तरी घटना घडतेच. अनेकांनी यामागची कारणे जाणण्याचा प्रयत्न केला पण हे गूढ अजूनही कायम आहे. गावातील काही लोक हा वाईट शक्तींचा परिणाम असल्याचे मानत आहेत. तर काही लोक अद्भूत शक्तींमुळे असे घडत असल्याचे सांगत आहेत. अनेकदा तर याठिकाणी लाईट बंद असतानाही वस्तू जळायला लागल्याचा घटना घडतात. 

अशा घटना आल्या समोर.. 
बाथरूमच्या काचमध्ये आग लागणे, पाण्याचे पाईप लीक होणे, एसी वितळायला लागणे, प्राण्यांचे प्राण आपोआप जातात आणि दारे आपोआप उघडू किंवा बंद होऊ लागतात. 

2007 मध्ये संशोधनात समोर आल्या या बाबी 
2007 मध्ये एखा वृत्तपत्राने नागरिक सुरक्षा विभागाचा एक अहवाल प्रकाशित केला होता. यात 'एलियन्स'बरोबर या प्रकाराचा संबंध जोडला होता. यासाठी 'अज्ञात विद्युत चुंबकीय विकिरण' (Radiation)ला जबाबदार ठरवले गेले. पण तरीही लोक अजूनही हे प्रकार काहीतरी अदभूत शक्तींमुशळे घडते असे समजतात. 
 
 
बातम्या आणखी आहेत...