Home »Khabrein Jara Hat Ke» Plain Crashes Into Swimming Pool

OMG... घराच्या स्विमिंग पूलमध्ये क्रॅश झाले प्लेन, बघा भीषण अपघाताची छायाचित्रे

दिव्य मराठी वेब टीम | Oct 12, 2017, 18:15 PM IST

आजवर प्लेन क्रॅशच्या अनेक घटना घडल्या आहेत. पण एखाद्या घराच्या स्विमिंग पूलमध्ये प्लेन क्रॅश झाल्याचे कधी तुमच्या ऐकिवात आले आहे का? अलीकडेच ब्राझीलमध्ये एक घटना घडली आहे. या दुर्घटनेत विमानात झालेल्या बिघाडामुळे ते एका घराच्या आत शिरुन क्रॅश झाले.

पुढे काय झाले...
ब्राझीलच्या साओ जोस रिओ प्रेतों स्टेटच्या एका घराच्या स्विमिंग पूलमध्ये प्लेन क्रॅश झाले. प्लेनचे एक विंग स्विमिंग पूलमध्ये तर दुसरा भाग हा बगिच्यात कोसळला. हे प्लेन विमानतळापासून केवळ 980 फूट लांब होते. विशेष म्हणजे या दुर्घटनेच्या वेळी घरात कुणीही हजर नव्हते. पण प्लेनमध्ये प्रवास करणा-या तीन व्यक्तींचा या दुर्घटनेत जागीत मृत्यू झाला. प्लेन नेमके कोणत्या कारणामुळे क्रॅश झाले, याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही.

पुढे बघा, या दुर्घटनेचे फोटोज...

Next Article

Recommended