आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Poland \'s \'Safe House\' Turns Into A Fortress Bu A Button

बटण दाबताच हे घर होते किल्ल्यामध्ये रुपांतरीत, अण्वस्त्र हल्ल्यातही राहिल सुरक्षित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलंडची राजधानी वर्सावा येथे बांधण्यात आलेल्या या घराला आर्किटेक्टच्या टीमने जगातील सर्वात सुरक्षित घर बनवण्याच्या प्रयत्न केला आहे. एक बटन दाबताच हे घर चारही बाजूंनी सिमेंट-कॉंक्रीटच्या भिंतीनी बंद होईल. त्यानंतर हे घर एखाद्या किल्ल्याप्रमाणे किंवा कॉंक्रीटच्या क्यूबसारखे दिसेल. अशा घरामध्ये कोणी कितीही प्रयत्न केला तरी त्याला प्रवेश करणे शक्य होणार नाही.

बटन दाबताच दरवाजे सील होतात, खिडक्या, दार कॉंक्रीटच्या भिंतीनी झाकले जातात. असे सांगण्यात येत आहे, की अशाप्रकारे हे घर बंद झाल्यांनतर या घरावर अण्वस्त्र हल्ला झाला तरी घर सुरक्षित राहिल. लॉक मोडमध्ये गेल्यानंतर या घरात प्रवेश करण्यासाठी फक्त दुसर्या मजल्यावरील पुलाचा (ब्रिज) वापर केला जाऊ शकतो. तेही मालकाची इच्छा असेल तरच.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी पुढील फोटोवर क्लिक करा....