आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृत्तवाहिनीवर थेट प्रक्षेपित झाली 'ब्‍ल्यू फिल्‍म', दर्शक झाले अवाक!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या वृत्तवाहिनीवर बातमीपत्राचे थेट प्रक्षेपण सुरु असताना कधी कधी विनोदी प्रसंग घडतात. कधी निवेदकाचा मेकअप करण्‍यासाठी कोणीतरी येतो आणि अनावधानाने त्‍याचेही थेट प्रक्षेपण होते. एखाद्या वेळेस ब्रेकमध्‍ये निवेदकाची बडबडही ऑन एअर जाते. परंतु, ग्रीसमध्‍ये अनावधानाने भयंकर प्रसंग घडला. एका वृत्तवाहिनीचे बातमीपत्र सुरु असताना निवेदकाच्‍या मागे लागलेल्‍या स्‍क्रीनवर चक्‍क पॉर्न चित्रपट सुरु झाला. त्‍यामुळे प्रेक्षकांना धक्‍काच बसला.

निवेदक देशातील ताज्‍या घडामोडींची माहिती देत होता. त्‍याचवेळी त्‍याच्‍या मागील बाजुला असलेल्‍या स्‍क्रीनवर पॉर्न चित्रपट सुरु झाला. प्रेक्षकांच्‍या माहितीनुसार स्‍क्रीनवर सुरु असलेला चित्रपट त्‍याचवेळी त्‍याच संस्‍थेच्‍या 'इटी1' या मनोरंजन वाहिनीवर सुरु होता. पॅनलवर झालेल्‍या चुकीमुळे ते सीन्‍स थेट प्रक्षेपित झाले. काही क्षणांमध्‍येच या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वा-यासारखा पसरला. या सर्व घटनाक्रमात निवेदक मात्र त्‍याच्‍या मागे काय सुरु आहे, याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ होता.