आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

555 दिवस हृदयाविना राहिला जिवंत, 24 तास बॅगेत ठेवायचा 6 किलोचे हार्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टान लारकिन दीड वर्षे हृदयाविना राहिला होता. त्याने नेहमी बॅगम्ये आर्टिफिशअल हृदय सोबत ठेवले होते. - Divya Marathi
स्टान लारकिन दीड वर्षे हृदयाविना राहिला होता. त्याने नेहमी बॅगम्ये आर्टिफिशअल हृदय सोबत ठेवले होते.
मिशिगन: अमेरिकेचा 25 वर्षीय स्टान लारकिनचे हृदय ट्रान्सप्लांट झाले. यापूर्वी तो जवळपास दीड वर्षे हृदयाविना राहिला होता. डॉक्टरांनी त्याला आर्टिफिशअल हार्ट लावले होते. हे हार्ट त्याच्या शरीरात रक्तपुरवठा करण्याचे काम करत होता. त्यामुळे स्टानला 24 तास बॅगमध्ये आर्टिफिशअल हृदय ठेवावे लागत होते.
काय आहे हे प्रकरण...?
- स्टार लारकिन आणि त्याचा सख्खा भाऊ डोमिनिकला बालपणी माहित झाले होते, की त्याला
हेरिडिटी कार्डियोमायोपॅथी आजार आहे.
- त्यात हृदय अलर्ट विना काम करणे बंद करते. हा एक दुर्मिळ आराज आहे. तरीदेखील दोन्ही भावांनी हार मानली नाही.
- ते सामान्य आयुष्य जगत राहिले. 2014मध्ये अचानक दोन्ही भावांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
- डॉक्टरांनी सांगितले, की हृदयाचे ट्रान्सप्लांट करावे लागेल.
- डोनर मिळाला नाही म्हणून डॉक्टरांनी आर्टिफिशअल हृदय लावण्याचा निर्णय घेतला.
- धाकट्या भावाला जानेवारी 2015मध्ये डोनर मिळाल्याने त्याच्या हृदयाचे ट्रान्सप्लांट करण्यात आले. परंतु स्टानला मेमध्ये डोनर मिळाला.
555 दिवस राहिला हृदयाविना...
- स्टान 555 दिवस आर्टिफिशअल हृदयाच्या आधारावर जगला. त्याचा हा एक रेकॉर्ड आहे.
- या आर्टिफिशअल हृदयाचे वजन 6 किलो (13.5 पाउंड) होते. स्टान अनेकदा हे हृदय घेऊन बास्केटबॉलसुध्दा खेळत होता. त्याला पाहून डॉक्टरांनासुध्दा आश्चर्य वाटत होते.
- स्टानने सांगितले, 'मला दोन आठवड्यांपूर्वी ट्रान्सप्लांटनंतर रुग्णालयातून सुटी मिळाली.'
- 'मी खूप आनंदी आहे, की मी आता पळू शकतो. मी त्या डोनरचे आभार मानतो. त्याने मला नवीन आयुष्य दिले.'
- 'मी त्याच्या कुटुंबीयांना एक दिवस नक्की भेटेल. मला आशा आहे, की ते मला भेटण्यास उत्सूक असतील.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा स्टान आणि त्याच्या धाकट्या भावाचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...