आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Portraits Of Migrants Who Suffered When Entering The US

अमेरिकेचा दुसरा चेहरा: स्वप्न असे होतात भंग, मिळते भयावह शिक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अमेरिकेमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणारी मॅरिना, अरमांडो आणि रिवोरा)
बलाढ्य आणि शक्तीशाली देश म्हणून अमेरिकेची ओळख आहे. येथे प्रत्येक सुविधा आहेत आणि सर्वप्रकारची जीवनशैलीसुध्दा. परंतु येथे प्रत्येकाला त्याचे ध्येय गाठता येत नाही. अमेरिकेला जाऊन आयुष्य सावरण्याचा प्रयत्न करणा-या अनेक लोकांना तिथे जाऊन काही मिळत असेल तर ती म्हणजे भयावह शिक्षा. प्रत्येकवर्षी जगाच्या पाठिवरील विविध देशांचे लोक अमेरिकेत जाऊन स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. अमेरिकेच्या आसपासचे लोक आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी घुसखोरीचा प्रयत्नदेखील करतात. परंतु अशा लोकांसोबत न्याय होत नाही. अशा प्रयत्नात अनेकांचे आयुष्य उध्वस्त होते.
फोटोग्राफरने दाखवला दूसरा चेहरा-
असे अनेक उदाहरणे आहेत, की जेव्हा अमेरिकेत घुसण्याचा प्रयत्न करणा-या लोकांसोबत अमानवीय व्यवहार होतो. मानवाधिकारांचे उल्लंघन झाले आहे. अमेरिकेच्या एका फोटोग्राफरने या चेह-याला दाखवण्याचा प्रयत्न केला. या फोटोग्राफरचे नाव निकोल ओकिन असून त्याने एका सीरीजतंर्गत फोटोग्राफ्स सादर केलेत. यामध्ये विविध काळात अमेरिकेत घुसणा-या लोकांचे नंतरचे आयुष्य दाखवले. अमेरिकेत घुसण्याचा प्रयत्न करणा-या अनेक लोकांना लैंगिक छळाचाही सामना करावा लागला.
बेकायदेशीरित्या अमेरिकेत एंट्री केल्याने 29 वर्षीय मॅरिनोवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र ती तिथून पळून जाण्यास यशस्वी ठरली. पण यात गंभीर जखमी झाली. अमेरिकेच्या कोणत्याच रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले नाही. तसेच टिओफिलो सँटोस रिव्होराला अनेक लोकांच्या हिंसेचा सामना करावा लागला. त्याला आपला पाय गमवावा लागला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अशा गैरवर्तणूकीला बळी पडलेल्या लोकांची छायाचित्रे...