आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Portuguese Photographer Take Amazon Tribe Under Threat

फोटोग्राफरने कैद केले अमेझॉनच्या लोकांचे फोटो, पाहा कसे आहे यांचे आयुष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- लुप्तप्राय जनजातीचे लोक)
अमेझॉन क्षेत्राच्या घनदाट जंगलात राहत असलेल्या लुप्तप्राय जनजातीच्या लोकांचे फोटो आपल्या कॅमे-यात कैद करण्याचे स्वप्न पोर्तुगील फोटोग्राफर डेनिअल रॉड्रिक्सचे होते. त्याचे हे स्वप्न मागील काही दिवसांपूर्वी पूर्ण झाले. दोन वर्षांपर्यंत आर्थिक मदत आणि सरकारी नोकरशाहीशी संघर्ष करून त्याला या लोकांपर्यंत येण्याची संधी मिळाली. डेनिअलने सोबत कॅमेरा आणि काही गरजेच्या वस्तू आणल्या होत्या. त्याला आवा-गुआजाच्या लोकांवर डॉक्युमेंट्री बनवायची होती.
'मी त्यांच्या मध्ये राहिलो, हा एक वेगळाच अनुभव होता. त्यांना माझी भाषा थोडीफार समजत होती. मी त्यांची भाषा समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. अनेक दिवस आम्ही केवळ इशा-यांवर बोललो. या लोकांना अधुनिक जगाचा थोडाही गंध नाहीये. त्यांना मोबाईल, लॅपटॉप या गोष्टी नवीन वाटत होत्या. हेलिकाफ्टर पाहून तर हे लोक अंचबितच झाले होते. मात्र, त्यांना या नवीन वस्तू पाहून खूप आनंद झाला. त्यांना मी अधुनिक जगाविषयी थोडीफार माहिती दिली, त्यांना आता ब-याच गोष्टी समजायला लागल्या आहे. ते आता अधुनिक जगाशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत', लुप्तप्राय जनजातीच्या लोकांसोहत राहिल्यानंतर अनुभव कसा होता हे सांगताना डेनिअलने म्हणाला.
घनदाट जंगलात राहणारे लोक आजसुध्दा शिकार करून आपले पोट भरतात. त्यांना निसर्गावर खूप प्रेम आहे, त्यांच्या राहणीमानावरून दिसते. डेनिअलने त्यांचे जीवन कॅमे-यात कैद करून सोशल साइट्सवर फोटो अपलोड केले. हे लोक ब्राजीलच्या मारनहाओ राज्यात राहतात, त्यांनी येथे वेगळी चार गावे वसवलेली आहेत. त्यामध्ये जवळपास 400 लोक राहतात. मागील 10 वर्षांमध्ये त्यांच्याकडे एकही बाहेरील क्षेत्रातील व्यक्ती आलेला नाहीये.
'या जनजातीच्या लोकांना लाकडाच्या दलालापासून धोका आहे. कारण हे दलाल जंगलातील झाडे कापत आहेत. अशीच स्थिती पुढे काही दिवस राहिली तर या लोकांचे जगणे कठिण होईल, असे डेनिअल म्हणतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा डेनिअलने आपल्या कॅमे-यात कैद केलेली या जनजातीच्या लोकांचे राहणीमान...
सोर्स- moscowfotoawards.com