आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटोग्राफरने टिपले आफ्रिकेतील जमातीच्या तरुणींचे PHOTOS, शूटसाठी लागली 7 वर्षे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर्मन फोटोग्राफरने 7 वर्षे आफ्रिकन जमातीचे फोटोशूट केले.
बर्लिन- 38 वर्षीय एका जर्मन फोटोग्राफरने आफ्रिकेच्या जमातीचे फोटो सादर केले आहेत. मॅरियो गर्थ नावाच्या या फोटोग्राफरने जवळपास 7 वर्षे आफ्रिकेचा दौरा करून फोटो क्लिक केले. त्याने केन्या, नामिबिया, इथियोपियासह इतर देशांत राहणा-या जमातीसोबत बराच वेळ घालवला आणि त्यांचे खासगी क्षण क्लिक करण्याची परवानगी मागितली.
हे फोटो या जमातीची लाइफस्टाइल दर्शवणारे आहेत. ते कसे कपडे परिधान करतात आणि कशाप्रकारे दागिने घालून राहतात, यांसारख्या अनेक बारीक गोष्टी फोटोग्राफर कॅमे-यात टिपल्या आहेत. फोटोग्राफर मॅरियोचे म्हणणे आहे, की या जमातीकडून आपण शिकू शकतो, की सुख आणि आनंद कसे मिळवले जाऊ शकते. काही काही आफ्रिकेतील जमातीच्या बायका प्राण्यांच्या कातड्यांपासून बनलेले कपडे घालतात. मॅरियोचे म्हणणे आहे, की या लोकांचे सुखी आणि आनंदी आयुष्य त्याला सर्वाधिक आकर्षित करणारे होते. साधे आयुष्य जगत असतानासुध्दा हे लोक कोणत्याच दु:खात जगत नाहीत. त्यांना कोणत्याच गोष्टीची कमी भासत नाही.
मॅरियो गर्थने सांगितले, की या जमातीच्या आयुष्यात अनेक अडचणी आहेत, आधुनिक सुविधा उपलब्ध नाहीये, परंतु त्यांच्या आयुष्यात आनंदाची कमी नाहीये. फोटोंमध्ये त्यांच्या रंगांचे शानदार मिश्रण दिसते. फोटोग्राफर म्हणतो, ही जमाती पर्यटकांपासून दूर राहते, परंतु त्यांना जाणवले, की काहीच यांच्यापासून धोका नाहीये तर ते लगेत आपल्यात मिसळतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आफ्रिकेच्या या जमातीचे PHOTOS...