भटिंडा- सहा दिवसांच्या पोलिस कोठडीत असलेल्या राम रहिमची मानसकन्या हनीप्रीतला गुरुवारी सकाळी, भटिंडाला नेण्यात आले. येथील रामपुरा पोलीस ठाण्यामध्ये आल्यानंतर पोलीसांना असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागले. हनीप्रीतला पाहण्यासाठी उतावीळ असलेल्या शेकडो स्थानीकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. रस्त्या पासून ते पोलीसठाणे येथपर्यंत जमलेल्या गर्दीत हनीप्रीतचे फोटो काढण्यासाठी उत्सुकता दिसून येत होती.
वारंवार मागत होती पाणी
येथे पोलिसांनी दोन तास तिला विविध प्रश्न विचारले. त्यावर तिचे एकच पालूपद होते, माला आठवत नाही की मी येथे आले होते की नाही? पोलिसांची प्रश्नांची सरबत्ती सुरु असताना हनीप्रीत वारंवार पाणी मागत होती आणि घाम पुसत होती.
हनीप्रीतला भटिंडाला का नेले?
- पोलिसांचा अंदाज आहे की हनीप्रीत फरार होती तेव्हा ती बहुतेक काळ पंजाबातील मालवा येथे लपून बसली होती. 39 दिवसांमधील बहुतेक दिवस ती भटिंडामध्ये होती. येथे सुखदीप कौर तिच्या मदतीला होती.
- पोलिसांच्या तपासात समोर आले की 4 दिवस सुखदीप कौरच हनीप्रीतची गाडी चालवत होती. चंदीगडच्या आसपासच्या परिसरात तीन ठिकाणी या दोघींनी सोबतच मुक्काम केला होता.
हनीप्रीतने 39 दिवसांत वापरले 17 सीम
- सूत्रांच्या माहितीनुसार, हनीप्रीतने 39 दिवसांमध्ये 17 सीमकार्डचा वापर केला. यातील तीन इंटरनॅशनल सीम होते. या दरम्यान ती अनेक लोकांच्या संपर्कात होती.
- पंचकुलाचे एसीपी मुकेश म्हणाले, हनीप्रीतने पंचकुलामध्ये दंगल भडकवण्याचा आरोप अजून स्वीकारलेला नाही. त्यामुळे तिची लायडिटेक्टर टेस्ट घेण्यासाठी कोर्टाला परवानगी मागितली जाणार आहे.
आणखी फोटो पहाण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...