आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rat Tribe: Hidden World Of One Million Migrants In China

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिजिंगमध्ये 10 लाखांपेक्षा जास्त लोक राहतात 'बंकर'मध्ये, असे जगतात आयुष्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बिजिंगमध्ये बंकरमध्ये राहणारे लोक)
चीनची राजधानी बिजिंगमध्ये राहणारे प्रत्येकासाठी सोपे नाहीये. यासाठी येथे रेट-ट्राईब (बेसमेंटमध्ये बंकरप्रमाणे बांधलेल्या खोल्या)मध्ये राहण्याची सर्वाधिक मागणी असते. या खोल्या खूप लहान आकाराच्या असतात. 1969मध्ये कम्युनिटी पार्टीचे चेअरमन माओंच्या कारकिर्दीत हल्ल्यांपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी बंकर तयार करण्यात आले होते. माओ यांच्यानंतर नवीन शासन डेंग शिओंपिंग यांनी दोन हजार घरे आपल्या ताब्यात घेतले. अनेक वर्षे ही घरे रिकामी होती, नंतर काही श्रीमंत लोकांनी या घरांचे रुपांतर हॉस्टेलमध्ये केले.
1990च्या दशकात चीनचे नवीन शासनाने या घरांना सरकारी हाऊसिंग स्किममध्ये सामील केले. यामध्ये राहणा-या लोकांना भाडे भरावे लागते. बंकरमध्ये राहणारे सर्वाधिक लोक प्रवासी कर्मचारी असून त्यांची संख्या 10 लाखांपर्यंत पोहोचली आहे. ही घरे उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात गरम राहतील अशा पध्दतीने बनवण्यात आली आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बंकरांमध्ये राहणा-या सामान्य लोकांचे आयुष्य...
सोर्स- nyooztrend.com