आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिअल लाइफमध्ये असे आहेत अमेरिकेचे सैनिक, फोटोग्राफरने क्लिक केले PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(यूनायटेड स्टेट्स नेव्हीची महिला ऑफिसर एड्रिने कॅमिले)
अमेरिकन सैन्य जगभरात आपल्या धाडस आणि जोमासाठी ओळखले जाते. लोक यांना हिरोपेक्षा कमी समजत नाहीत. परंतु हे सैनिकदेखील सामान्य लोकांप्रमाणेच आयुष्य जगतात. वरील छायाचित्र पाहून तुम्ही अंदाजा लावू शकता, की सैनिक खासगी आयुष्यात कसे राहतात. वरील छायाचित्रात यूएस आर्मीच्या जवानांना सैनिक आणि रिअल लाइफच्या कॅनव्हासमध्ये दाखवण्यात आले आहे. अमेरिकेच्या एरिजोना भागात राहणारा फोटोग्राफर डेव्हिन मिशलने ही छायाचित्रे घेतली आहेत.
त्यामध्ये त्याने यूएस आर्मीच्या जवानांना आरशासमोर उभे केले आहे आणि फोटोशॉपच्या साहाय्याने रिअल लाइफ आणि सैनिकी लाइफची झलक दाखवली आहे. या छायाचित्रात सैनिक आपल्या चित्र-विचित्र हेअरस्टाइलमध्ये दिसत आहेत. काही छायाचित्रांत महिला सैनिक सैनिकी ड्रेसऐवजी फॅशनेबल ड्रेसमध्ये दिसत आहेत. काही तरुण सैनिक महिलांच्या वेशभूषेतसुध्दा दिसत आहेत. आता ही छायाचित्रे पाहूनच अंदाजा येतो, की पुढील स्लाइड्सवर कशी आकर्षित करणारी छायाचित्रे असतील. वरील छायाचित्र यूनायटेड स्टेट्स नेव्हीच्या महिला ऑफिसर एड्रिने कॅमिलेचे आहे. आरशाच्या समोर ती ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे आणि आरशात ती सैनिकी रुपात दिसते.
फोटोग्राफर डेव्हिन मिशल म्हणतो, 'मला नेहमीच जाणून घ्यायची उत्सूकता होती, की सोनिक आपल्या खासगी आयुष्यात कसे राहतात. त्यासाठीच मी अशी छायाचित्रे घेतली आहेत. याचे नाव 'द सोल्जर आर्ट प्रोजेक्ट' ठेवले आहे. मला छायाचित्रे घेण्यासाठी अमेरिकन सैनिकांना भरपूर प्रतिसाद दिला. त्यामुळेच हा प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकला.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा डेव्हिन मिशलने क्लिक केलेली अमेरिकन सैनिकांची काही खासगी आयुष्यातील छायाचित्रे...