आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन तोंड, दोन नाक आणि 3 निळे डोळे असलेला बोका, 15 वर्ष राहिला जिवंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो : फ्रँकलुई नावाचा बोका)

दोन तोंड, दोन नाक आणि तीन निळे डोळे असलेला बोका फ्रँकलुईचे 15 व्या वर्षी निधन झाले. हा बोका जन्मला त्यावेळी काही दिवसच हा जिवंत राहील असे सांगण्यात आले होते, परंतु 15 वर्ष जिवंत राहून याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वतःचे नाव नोंदवले.

अमेरिकेतील वोरकेस्टर शहरातील या बोक्याचा मृत्यू टफ्ट्स यूनिवर्सिटीच्या कमिंग्स स्कूल ऑफ वेटरनरी मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये झाला. या बोक्याच्या मालकिणीने सांगितले की, बोक्याचा मृत्यू कॅन्सरमुळे झाला असल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. मार्टी या बोक्याच्या डाव्या बाजूच्या तोंडाला फ्रँक आणि उजव्या बाजूच्या तोंडाला लुई नावाने बोलवत असे. जगातील दोन तोंड असणारी कोणतीच मांजर एवढे वर्ष जिवंत राहिलेली नाही. दोन तोंड असलेल्या मांजरीला दोन तोंड असलेल्या रोमन देवता जानुसच्या नावावर जानुस मांजर असेही म्हटले जाते. या प्रकारच्या मांजरी जास्त काळ जिवंत राहतील याची शक्यता फारच कमी असते.

मार्टीला हा बोका 1999 मध्ये एका वेटरनरी नर्सने आणून दिला होता. सुरुवातीला या बोक्याला खाण्यासाठी दोन्ही तोंडात नळी घालून अन्न दिले जात होते. परंतु काही काळानंतरच मार्टीच्या लक्षात आले की, या बोक्याचे डाव्या बाजूचे तोंडच अन्न नलिकेशी जुळलेले आहे. फ्रँकलुईच्या तीन डोळ्यामधील मधला डोळा काम करत नव्हता परंतु इतर दोन डोळ्यांनी त्याला स्पष्ट दिसत होते. या बोक्याला दोन तोंड आणि दोन नाक होते परंतु मेंदू एकच होता.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा या बोक्याचे फोटो...