आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरी सोडून फोटोग्राफरने दाखवले जगभरातील महिलांचे सौंदर्य, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हवाना, क्यूबामध्ये कैद केलेला एका तरुणीचा फोटो - Divya Marathi
हवाना, क्यूबामध्ये कैद केलेला एका तरुणीचा फोटो
बुखारेस्ट: जगभरात अनेक असे लोक आहेत, जे छंद पूर्ण करण्यासाठी काहीही करू शकतात. असाच रोमनियाचा रहिवासी फोटोग्राफर मिहाएला नोरोक आहे. त्याने 3 वर्षांपूर्वी नोकरी सोडली आणि जगभरात विविध देशांच्या महिलांचे सौंदर्या कॅमे-यात कैद केले. आतापर्यंत तो 45 देशांत फिरला.
दाखवले आहे भारतीय महिलांचे आयुष्य ...
मिहाएलाने 'द एटलस ऑप ब्युटी' या प्रोजेक्ट अंतर्गत हे फोटो कैद केले आहेत. काही महिन्यांपूर्वी त्याने भारतीय महिलांचे फोटो काढले होते. मिहाएलाने सांगितले, की लोक धर्म, देश आणि जातीच्या मुद्यावरून वाद घालत आहेत. लोकांनी एकमेकांना सन्मान करायला हवा. त्याने सांगितले, की जगात एक एटलस ऑफ ब्युटीची गरज आहे. त्याला वाटते, की त्याचे हे
फोटो जगातील विविधता आणि सहिष्णुतेला प्रोत्साहित करतील.
विना मेकअप चेहरे क्लिक करतो मिहाएला...
नॅचरल फेस दाखवण्यासाठी मिहाएला आजूबाजूच्या परिसराशिवाय विना मेकअप महिलांचे चेहरे कॅमे-यात कैद करतो. त्याने सांगितले, की अनेकदा फोटोशूट 30 सेकंदात होऊ जाते. कधी-कधी तासन् तास वेळ द्यावा लागतो. मिहाएलाला 5 भाषा येतात, जे त्याच्या प्रोजेक्ट्साठी उपयोगी पडतात. मात्र, अनेकदा अज्ञात भाषा बोलायला त्याला अडचणी येतात. परंतु आपल्या बॉडी लँग्वेजने तो समजावून सांगतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'द एटलस ऑफ ब्युटी'चे फोटो...
बातम्या आणखी आहेत...