आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियन मॉडेलने कच्च्या मटनापासून तयार केलेला ड्रेस घालून केले फोटोशूट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये फॅशनच्या नावाखाली काय-काय होत आहे, याविषयी फार कमी लोकांना माहिती असावे. यामधील काही फॅशन ट्रेंड्स खूप चांगले तर काही अत्यंत वाईट असतात. असेच काहीसे फॅशन फोटोशूट एका रशियन मॉडेलने केले आहे. या मॉडेलने कच्च्या मीट(मटन)पासून तयार केलेला ड्रेस परिधान करून 4 तासांचे फोटोशूट केले.

इंस्टाग्रामवर फेमस आहे ही मॉडेल...
सेंट पिटर्सबर्गमध्ये वास्तव्यास असलेली युलिया कॉनेवा इंस्टाग्रामवर खूप पॉप्युलर आहे. हे फोटोशूट तिने मॅगझीम इंटरनॅशनल मेन्स मॅगझीनसाठी केले आहे. हा ड्रेस नताल्या फदीवाने डिझाईन केला आहे. युलियापूर्वी अशाप्रकारचा ड्रेस 2011 मध्ये लेडी गागाने एमटीव्हीच्या एका शोमध्ये परिधान केला होता. त्यानंतर अॅॅनिमल लव्हर्सने यावरून खूप गोंधळ घातला होता.

- युलियाने सांगितले की, हा ड्रेस परिधान करण्यासाठी 1 तास लागला. त्यानंतर 4 तास फोटोशूट चालले. या दरम्यान मटणाच्या स्मेलचा खूप त्रास झाला आणि श्वास घेणेही अवघड जात होते. युलियाने हा ड्रेस परिधान करून केलेल्या फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवरसुद्धा अपलोड केले आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, युलियाचे इतर काही खास फोटो...
बातम्या आणखी आहेत...