आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Russian Photographer Shows Heartbreaking Life Of 2 Year Child Of Drug Addict Parents

नशेत चूर झालेल्या आईबापासह अशी राहायची चिमुकली, Photos पाहून रडू येईल तुम्हाला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आईबापाला व्यसन असल्यावर चिमुकल्यांची लाइफ अशी असते. - Divya Marathi
आईबापाला व्यसन असल्यावर चिमुकल्यांची लाइफ अशी असते.
रशियन फोटोग्राफर इरिना पोपोव हिने 2008मध्ये एका कुटुंबाचे फोटोज क्लिक केले होते. या कुटुंबाशी तिची भेट सेंट पीटर्सबर्गच्या बाहेर एका क्लबमध्ये झाली होती. येथे 2 वर्षांची चिमुकली अनिफ्षाला घेतलेली तिची आई लिलियाशी ती पहिल्यांदा भेटली होती. याच्या पुढच्या दोन आठवड्यांत इरिनाने पूर्ण कुटुंबाचे फोटो क्लिक केले. ड्रग अॅडिक्ट आई-वडिलांच्या मुलांचे काय हाल होतात, या फोटोंमधून तुम्हाला लक्षात येईल.
 
छोट्याशा रूममध्ये दररोज व्हायच्या ड्रग पार्टीज..
या प्रोजेक्टमध्ये काढलेले फोटोज इरिनाने सेंट पीटर्सबर्गमध्ये आयोजित एका वर्कशॉपमध्ये प्रदर्शित केले होते. लोकांनी जेव्हा ड्रग अॅडिक्ट पालकांमध्ये चिमुकलीला पाहिले, तेव्हा सर्वांचे हृदय भरून आले. नशेत चूर मायबाप छोट्याशा घरात रोज पार्ट्या करतात. फोटो घेताना अनेकदा इरिनाला संतापही आला. परंतु तिने त्यांच्या दखल दिली नाही. या फोटोत नशेत धूत आईला झोपलेली पाहून चिमुकली अनिफ्षा तिथाल्या सिगारेट्सशी खेळू लागली. ज्या गोष्टीपासून प्रत्येक आई आपल्या मुलांना दूर ठेवते, त्यासोबत खेळत असलेल्या अनिफ्षाला पाहण्यासाठी तिच्या आईला शुद्धच नव्हती.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आईवडिलांसह कसा जायचा मुलीचा वेळ...
बातम्या आणखी आहेत...