(छायाचित्रः ज्युलिया विन्स)
पॉवरलिफ्टर युलिया व्हिक्टोरोवना ऊर्फ ज्युलिया विन्सची छायाचित्रे सध्या इंटरनेटवर व्हायरल झाली आहेत. बाहुलीसारखा सुंदर चेहरा आणि बलदंड शरीरयष्टीची 18 वर्षांची ज्युलिया रशियातील इन्जेल्स येथील रहिवासी आहे.
कणखर शरीरयष्टीसाठी तसेच आत्मविश्वास वाढवण्यासाठी तिने व्यायामाला सुरुवात केली होती, मात्र, व्यावसायिक भारोत्तोलक होण्याची इच्छा नव्हती, असे ज्युलिया सांगते. अशी शरीरयष्टी कमावण्यासाठी तिने कोणत्याही पारंगत प्रशिक्षकाची मदत घेतलेली नाही.
व्यायामादरम्यान स्वत:चे शरीर हार्मोन्सनुसार विकसित करण्याचे तंत्र तिला गवसले. एका वर्षातच तिने असामान्य प्रगती केली. आता ती प्रोफेशनल पॉवरलिफ्टर बनली आहे. या क्षेत्रात असल्यामुळे अनेकदा
आपल्यावर टीका होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे ज्युलिया सांगते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा ज्युलिया विन्सची खास छायाचित्रे...