आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहो आश्चर्यम! असा अडकला आहे हा पवित्र दगड, पूजा करायला येतात हजारो लोक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हे बर्माच्या बुद्धिस्ट लोकांचे प्रमुख तीर्थ स्थळ आहे) - Divya Marathi
(हे बर्माच्या बुद्धिस्ट लोकांचे प्रमुख तीर्थ स्थळ आहे)
म्यानमारमध्ये जवळपास 25 फुट उंचावर एक जड आणि भलामोठा दगड आहे. हा दगड छोट्या आकाराच्या दगडांवर उतरत्या दिशेने अटकलेला आहे. स्थानिक लोक याला पवित्र मानतात आणि त्याची पूजा करण्यासाठी गर्दी करतात. याला गोल्डन रॉक आणि क्यॅकटियो पगोडासुध्दा म्हणतात. या दगडाविषयी सांगितले जाते, की हे दृश्य ग्रॅव्हिटीला आव्हान देणारे आहे. हे बर्माच्या बुद्धिस्ट लोकांचे प्रमुख स्थळसुध्दा आहे.

ज्या छोट्या आकाराच्या दगडावर हा मोठा दगड अडकलेला आहे, त्यावरून असे दिसते, की हा कोणत्याही क्षणी खाली कोसळू शकतो. परंतु हा अनेक वर्षांपासून अशाच स्थितीत आहे. नोव्हेंबर ते मार्चमध्ये येथे हजारो संख्येत लोक दर्शनासाठी आणि मेणबत्त्या जाळण्यासाठी येतात. स्थानिक लोक मानतात, की जर वर्षातून तिनदा या पवित्र स्थळावर आल्यास धन आणि सुख-समृध्दी लाभते.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या अनोख्या ठिकाणाचे खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...