आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम तरुणीने मिनी स्कर्ट परिधान करून पोस्ट केला व्हिडिओ, लगेचच उडाला गोंधळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौदी अरबमधील महिलांची स्थिती सर्वांनाच माहिती आहे. आजही येथे महिलांवर अनेक अत्याचार होत असतात. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले जात नाही. नुकतीच सौदीत राहणारी एक तरुणी अशीच अडचणीत सापडली होती. एक व्हिडिओ सोशल साईटवर शेअर केल्याने ती अडचणीत आली होती. 

यामुळे चर्चेत आला व्हिडिओ.. 
या तरुणीचे नाव खुलूद असल्याचे सांगितले जात आहे. ही मॉडेल नुकतीच ऐतिहासिक उशायकिर किल्ल्यात फिरायला गेली होती. त्याठिकाणी तिने तिचा एक व्हिडिओ तयार केला. त्यात तिने किल्ल्याचे सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न केला. पण सौदीतील काही कट्टर लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर खुलूदला अटक करण्याची मागणी केली. व्हिडिओत खुलूद मिनी स्कर्ट आणि क्रॉप टॉप परिधान केलेली दिसत आहे. ते पाहून काही लोकांनी हा नियमभंग असून तिच्या अटकेची मागणी केली आहे. 
 
वेगाने व्हायरल झाला व्हिडिओ.. 
मॉडेलने हा व्हिडिओ सर्वात आधी स्नॅपचॅटवर शेयर केला होता. त्यानंतर कोणीतरी तो ट्विटरवर अपलोड केला. तिथूनच व्हिडिओ व्हायरल झाला होता. काही लोकांनी मॉडेलला अटक करण्याची मागणी केली आहे, तर काहिंनी तिला पाठिंबा दर्शवला आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, खुलूदच्या व्हिडिओतील काही स्क्रीनशॉट्स.. 
बातम्या आणखी आहेत...