आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांना सर्वात जास्त आवडतात अशा चेहऱ्याचे पुरूष, हे आहे कारण...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आकर्षण अनेक बाबींवर अवलंबून असते. यात, सौदर्य, स्मार्टनेस, उंची, आवाज, स्वभाव, सवयी या सर्व बाबींचा समावेश असतो. पंरतु, विज्ञानाच्या दृष्टीने माणूस देखील एक प्राणिच आहे, त्यामुळे आकर्षणामागे काही बायोलॉजिकल कारणे देखील आहेत. पुरुषांचा एक खास प्रकारचा चेहरा महिलांना आकर्षित करतो, असा शोध वैज्ञानिकांनी लावला आहे.

असा असतो चेहरा...
सायकॉलॉजिकल सायन्स नावाच्या एका मासिकात प्रसिद्ध झालेल्या एका आभ्यासानुसार, महिलांना रुंद चेहऱ्याचे पुरूष आधिक आकर्षक वाटतात आणि त्या त्यांना परत-परत भेटण्यास इच्छूक असतात.
- ही पसंती अधिक काळ सोबत राहण्यासाठी किंवा लग्न करण्यासाठी नाही, तर रुंद चेहऱ्याच्या पुरुषांना शॉर्ट टर्म रिलेशनशीपसाठी अधिक पसंती दिली जाते.
- सिंगापूर मॅनेजमेन्ट विद्यापिठाचे सायकॉलॉजिकल सायंटिस्ट कॅथरीन वॅलेन्टाइन यांच्या नेतृत्वात हे संशोधन करण्यात आले आहे. त्यांच्या मते, आमच्या रिअल लाइफ आभ्यासात अवघ्या 3 मिनिटांच्या भेटीत महिलांनी मजबूत आणि रुंद चेहऱ्याच्या पुरूषांना अधिक पसंती देत त्यांच्यासोबत पुन्हा डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली.
- वैज्ञानिकांनी चेहऱ्याची रूंदी आणि शरिराची लांबी यामध्यील रेशिओ (fWHR)च्या आधारावर आकर्षणाची पारख केली. त्यातून आलेल्या निष्कर्षानुसार, ज्या पुरूषांमध्ये fWHR रेशिओ जास्त आहे, म्हणजे ज्या पुरुषांच्या चेहऱ्याची रूंदी जास्त होती, त्यांनाच महिलांनी अधिक पसंती दिली.
- पुर्वी करण्यात आलेल्या अनेक आभ्यासातून हे समोर आले होते की, रुंद चेहऱ्याचे पुरूष अधिक मजबूत आणि रागीट आसतात. समोरा-समोरच्या लढाईत ते जिंकण्याची शक्यता आधिक असते.
- तज्ञांच्या मते, शॉर्ट टर्म रिलेशनशिपमध्ये प्रेम आणि भावनांपेक्षा शरीर अधिक महत्वाचे असते. रुंद चेहरा असणाऱ्या पुरूषांमध्ये मजबूती, हेकेखोरपणा आणि आक्रमकता झळकत असते, त्यामुळे महिलांना असे पुरूष अधिक आकर्षक वाटतात. अशा पुरूषांमध्ये टेस्टॉस्टेरॉन नावाचे हर्मॉन अधिक असते.
 
पुढील स्लाइडवर वाचा, दिर्घकाळ रिलेशनशिपसाठी अशा चेरऱ्याला नाही नापसंती...
बातम्या आणखी आहेत...