आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Scientist Found Evidences To Prove Human Sacrifice

REVEALED: नरभक्षी होते हे मानव, खायचे दुसऱ्या मानवांचे मांस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो केवळ सादरीकरणासाठी वापरला आहे.)
आपले पूर्वज मानव इतर मानवांना ठार मारायचे. त्यांचे मांस खायचे हे संशोधनाचा सिद्ध झाले आहे. यापूर्वी आपले पूर्वज नरभक्षी असल्याचे अनेक दावे करण्यात आले होते. पण त्याचे ठोस पुरावे उपलब्ध नव्हते. आता नवीन संशोधनात आढळून आले आहे, की कित्येक वर्षांपूर्वी मृत्युमुखी पडलेल्या मानवाच्या हाडांवर इतर मानवांच्या दातांच्या खुणा सापडल्या आहेत.
इंग्लंडमधील सॉमरसेट येथील एका गुफेत संशोधकांना मानवांचे अत्यंत जुने अवशेष सापडले आहेत. यावर संशोधन करण्यात येत आहे. यात मानवांना ठार मारुन त्यांचे मांस खाण्याचे सबळ पुरावे सापडले आहेत. यापूर्वी कधीही अशा स्वरुपाचे पुरावे सापडले नव्हते.
मांस चघळण्याचे मिळाले पुरावे
रेडियोकार्बन डेटिंग पद्धतीने माहिती मिळाली आहे, की या गुफेत सापडलेले मानवी अवशेष सुमारे 15,000 वर्षे जुने आहेत. मानवाला ठार मारणे, त्याचे मांस खाणे आदी पुरावे येथे सापडले आहेत. तेव्हा मानवी मांस खाणे अगदी सामान्य बाब होती.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा.... हे आहेत ह्युमन इटर... यांनी खाल्ले आहे मानवी मांस..